Ravichandran Ashwin On ODI World cup 2023 : भारतात 5 ऑक्टोबरपासून एकदिवस क्रिकेट सामन्यांच्या विश्वचषकाची स्पर्धा रंगणार आहे. टीम इंडियात नवख्या खेळाडूंसह कोणते अनुभवी खेळाडू खेळणार, असा प्रश्न तमाम क्रिकेटप्रेमींना पडला आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने वर्ल्डकपसाठी टीम इंडियात निवड होण्याच्या शर्यतीत अनेक खेळाडू असल्याचं बोललं जात आहे. कारण अनुभवी खेळाडूंना संधी मिळाली नाही, तर त्यांच्या क्रिकेट करिअरला कोणतं वळण लागेल, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. अशातच टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये त्याच्या निवडीबाबत मोठं विधान केलं आहे.

अश्विनने म्हटलं आहे की, आगामी वनडे वर्ल्डकपच्या योजनांमध्ये सामील न होण्याबाबत मला कोणत्याही प्रकारचा दु:ख वाटणार नाही. माझ्या हातात ज्या गोष्टी नाहीत, त्यांचा मी विचार करणार नाही,असंही अश्विननं म्हटलं आहे. अश्विन भारतीय क्रिकेट संघाचा नियमित सदस्य आहे. परंतु, मागील काही काळापासून तो वनडे क्रिकेटचा भाग नाहीय. आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये नंबर वन गोलंदाज अश्विनने त्याचा शेवटचा एकदिवसीय क्रिकेटचा सामना गतवर्षी जानेवारीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. माध्यमांशी बोलताना या वरीष्ठ खेळाडूनं म्हटलं की, मी अशा गोष्टींचा विचार करत नाही, ज्या माझ्या हातात नाहीत.

Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Amol Mitkari On Jayant Patil :
Amol Mitkari : “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार”, अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, चर्चांना उधाण
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
ravi rana resign
अमरावती : नवनीत राणा म्‍हणतात, “…तर रवी राणा देखील राजीनामा देतील”
Sharad Pawar On Mahavikas Aghadi
Sharad Pawar : विधानसभेतील पराभवानंतर आता ‘मविआ’चं भविष्य काय? शरद पवारांनी सांगितली पुढची रणनीती

नक्की वाचा – IND v IRE: रिंकू सिंगचा धमाका! भारताच्या ‘या’ माजी दिग्गज खेळाडूने उधळली स्तुतीसुमने, म्हणाले, “रिंकू हा धोनी,युवराजसारखा…”

अश्विन म्हणाला, मी असा विचार करत नाही, कारण संघाची निवड करणं माझं काम नाही. मी अशा गोष्टींचा विचार करणार नाही, हे मी आधीच निश्चित केलं होतं. मी माझ्या आयुष्यात आणि क्रिकेटमध्ये खूप चांगल्या ठिकाणी आहे. आणि मी प्रत्येक वेळी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करतो. टूर्नामेंटमध्ये सामील होण्याच्या रेसमध्ये नसतानाही अश्विनने म्हटलं, भारताला पुन्हा विश्वकप जिंकण्यात यश मिळो, अशीच आशा करतो. मी प्रत्येक दिवसासाठी जगत असतो आणि माझ्याकडे कोणताच अपूर्ण काम नाही. परंतु, हे सत्य आहे की, मी मैदानात असो किंवा नसो,भारताने पुन्हा विश्वकप जिंकावं, अशी माझी इच्छा आहे. अश्विनने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत ११३ सामन्यात ३३.४९ सरासरीनं १५१ विकेट्स घेतल्या आहेत.

Story img Loader