Ravichandran Ashwin Broke Anil Kumble Record IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने आणलेल्या व्यत्यतामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ लंच ब्रेकनंतर रद्द करण्यात आला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या सत्रातच भारताने ३ विकेट मिळवल्या, ज्यात आकाशदीपने २ तर आर अश्विनने एक विकेट घेतली. ही पहिली विकेट घेताच रविचंद्रन अश्विनने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू आर अश्विनने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अश्विनने या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोला बाद करताच तो आशिया खंडात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. या विशेष यादीत त्याने भारताचा माजी दिग्गज खेळाडू अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. या यादीत अनिल कुंबळे ४१९ विकेट्स घेऊन पहिल्या क्रमांकावर होते, मात्र आता अश्विनच्या नावावर आशियामध्ये ४२० विकेट्स आहेत.

हेही वाचा – IND vs BAN: विराट कोहली २२ वर्षीय नेट बॉलरकडून सलग दोन वेळा बाद; भेदक गोलंदाजी पाहून विराटने विचारलं, “अरे तू किती…”

आशिया खंडात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत आर अश्विनने भलेही अव्वल स्थान पटकावले असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर तो दुसऱ्या स्थानी आहे. आशिया खंडात सर्वाधिक विकेट मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहेत. मुथय्या मुरलीधरनने आशियामध्ये ६१२ विकेट घेतल्या आहेत. मात्र, या यादीत अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. मुथय्या मुरलीधरनला मागे टाकण्यासाठी त्याला १९३ विकेट्सची गरज आहे. जे खूप कठीण काम असणार आहे.

हेही वाचा – IND vs BAN: सरप्राईज, सरप्राईज…, आकाशदीपची भेदक गोलंदाजी अन् परफेक्ट निर्णय, रोहित शर्माही झाला अवाक्, पाहा VIDEO

आशिया खंडात कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडू

६१२ – मुथय्या मुरलीधरन
४२०* – रविचंद्रन अश्विन<br>४१९ – अनिल कुंबळे
३५४ – रंगना हेरथ
३०० – हरभजन सिंग

हेही वाचा – IND vs BAN: बांगलादेश संघाच्या चाहत्याला कानपूर स्टेडियममध्ये मारहाण, शिवीगाळ करून जमावाने हल्ला केल्याचा आरोप

आर अश्विनने नजमुल शांतोला झेलबाद केल्याचे अपील प्रथम संघाने केले होते. यावर पंचांनी नाबाद असा निर्णय दिला यानंतर रोहित शर्माने रिव्ह्यूचा निर्णय घेतला. यानंतर रिव्ह्यूमध्ये नजमुल शांतो पायचीत झाल्याचे दिसले आणि त्याला बाद घोषित केले. या विकेटसह अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस फलंदाजाला पायचीत करत विकेट घेणारा ५वा गोलंदाज ठरला. त्याने महान ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांना या यादीत मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक फलंदाजांना पायचीत करत विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे.

हेही वाचा – IND vs BAN: बांगलादेश संघाच्या चाहत्याला कानपूर स्टेडियममध्ये मारहाण, शिवीगाळ करून जमावाने हल्ला केल्याचा आरोप

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक फलंदाजांना पायचीत करत विकेट घेणारे गोलंदाज

१५६ – अनिल कुंबळे
१४९ – मुरलीधरन
१३८ – शेन वॉर्न
११९ – वसीम अक्रम
११४ – आर अश्विन
११३ – ग्लेन मॅकग्रा
११२ – कपिल देव