आगामी इंडियन प्रीमियर लीगकरिता (आयपीएल) किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनकडे सोपवण्यात आले आहे. या संघात युवराज सिंग आणि ख्रिस गेलसारख्या मातब्बर खेळाडूंचा समावेश आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
आयपीएलच्या आठ हंगामांमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या दोन विजेतेपदांमध्ये अश्विनचा सिंहाचा वाटा होता. याशिवाय एक हंगाम तो पुणे सुपरजायंट्सकडून खेळला. या जबाबदारीविषयी तो म्हणाला, ‘‘गुणी खेळाडूंच्या संघाचे नेतृत्व मिळणे, हा एक प्रकारचा सन्मान असतो. येत्या आयपीएल हंगामात आम्ही सर्वोत्तम कामगिरी बजावू, याची खात्री आहे. हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे.’’
First published on: 27-02-2018 at 02:47 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravichandran ashwin captain of kings xi punjab in ipl