R Ashwin Cryptic Post on IND vs AUS Melbourne Test: भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटी खूपच रोमांचक वळणावर होती आणि अखेरच्या सत्रापर्यंत या कसोटीचा निकाल काय लागणार याची कल्पना नव्हती, पण ऑस्ट्रेलियाने त्यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मेलबर्न कसोटी आपल्या नावे केली. यादरम्यान भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एक्सवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. बॉर्डर गाव्सकर ट्रॉफी 2024-25 दरम्यान निवृत्ती जाहीर केल्यानंतर अश्विन सोशल मीडियावर खूपच सक्रिय झाला आहे. त्याने या कसोटीदरम्यान काही खोचक पोस्ट शेअर केल्या, ज्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

\

आर अश्विनला चाहत्यांनी का केलं ट्रोल?

अश्विनने सोमवारी सकाळी ९.४९ वाजता एक पोस्ट टाकली. त्यात त्याने लिहिलं, “चांगलं नेतृत्त्व करणारे नेते तेव्हाच पुढे येतात जेव्हा ते कोणतीही दृढनिश्चयाने पूर्ण करू पाहतात.” या पोस्टमध्ये कोणाचेही नाव नव्हते किंवा ती कोणाबद्दल आहे हेही या पोस्टमध्ये नव्हते, त्याचबरोबर कोणताही हॅशटॅगदेखील वापरला नव्हता. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांना हे दोघेही खेळाडू बाद झाल्यामुळे त्यांना टोमणा मारल्याचे वाटले आणि अश्विनला ट्रोल करण्यास सुरूवात झाली.

हेही वाचा – IND vs AUS: “…त्या क्षणीच आम्ही सामना गमावला”, रोहित शर्माने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण; सामन्यानंतर मोठं वक्तव्य

काही वेळानंतर त्याच पोस्टला उत्तर देताना अश्विनने लिहिले की, “हे ट्विट त्यांच्यासाठी नाही ज्यांचे फॅन क्लब आहेत.” अश्विनने आपल्या अंदाजात चाहत्यांच्या ट्रोलिंगला यातून उत्तर दिलं. पण प्रकरण इथेच थांबलं नाही. चाहत्यांनी अश्विनला कोहली आणि रोहित शर्माबाबत काही बोलू नये, असा सल्लाही दिला. अखेर या फिरकीपटूला याप्रकरणी खुलासा करावा लागला.

हेही वाचा – Yashasvi Jaiswal Wicket: यशस्वी जैस्वाल आऊट की नॉट आऊट? तिसर्‍या पंचांच्या निर्णयावरून मतमतांतरं; पुन्हा एकदा भारताविरूद्ध चुकीचा निर्णय?

पण ही पोस्ट कोणासाठी होता याचा खुलासा करण्यापूर्वी अश्विनने यशस्वी जैस्वालच्या वादग्रस्त बाद देण्याच्या निर्णयावर त्याचा फोटो शेअर करत सामन्यातील मोठी क्षण असल्याचे म्हटले. पण या पोस्टनंतर मात्र अश्विनने त्याने याआधीच्या खोचक पोस्ट कोणासाठी केल्या होत्या, याबाबत पुन्हा पोस्ट शेअर करत खुलासा केला.

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताला पराभवानंतर धक्का, अंतिम फेरी गाठण्याकरता भारतासाठी कसं असणार समीकरण?

रविचंद्रन अश्विनने सांगितलं की, त्याने या पोस्ट यशस्वी जैस्वालसाठी केल्या आहेत. त्याने चाहत्यांना सुनावत म्हटलं, आजकाल, गोष्टी ज्या संदर्भाने बोलल्या जातात त्यापेक्षा त्याचा उलट अर्थ घेतला जातो. मी या पोस्टमध्ये यशस्वी जैस्वालबद्दल बोलत होतो. मित्रांनो शांत व्हा.’ जैस्वाल सोमवारी दुसऱ्या डावात २०८ चेंडूत ८४ धावा करून बाद झाला. तो बाद होताच भारताच्या सामना वाचवण्याच्या आशा संपुष्टात आल्या.

हेही वाचा – “विराट खेळत राहील पण रोहित…”, रवी शास्त्रींचं विराट-रोहितच्या निवृत्तीवर मोठं वक्तव्य, कर्णधाराबद्दल स्पष्टच बोलताना म्हणाले…

u

u

मेलबर्न कसोटीत भारतीय फलंदाज पुन्हा एकदा गडबडले. ऑस्ट्रेलियाकडून भारताला १८४ धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. आता ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. विजयासाठी दिलेल्या ३४० धावांना प्रत्युत्तर देताना भारताने २०.४ षटकांत १५५ धावांवर सर्वबाद झाला. भारताने शेवटच्या सात विकेट ३४ धावांत गमावल्या.