Ashwin is ready pay to watch Ruturaj Gaikwad batting in nets: भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडचे कौतुक केले आहे. रविचंद्रन अश्विन गायकवाडच्या फलंदाजीची स्तुती करताना म्हणाला तो फलंदाजी सोपी करण्यासाठी जन्म आला आहे. याशिवाय अश्विन गायकवाडचे वर्णन करताना म्हणाला तो जागतिक दर्जाचा फलंदाज आहे. ऋतुराज गायकवाड सध्या टीम इंडियासोबत आयर्लंड दौऱ्यावर आहे. तिथे तीन सामन्याची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकून १-० अशी आघाडी घेतली आहे.
रविचंद्रन अश्विनला ऋतुराज गायकवाडची फलंदाजी इतकी आवडते की, तो पैसे देऊनही त्याची फलंदाजी बघायला तयार आहे. आर अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना ऋतुराज गायकवाडबद्दल म्हणाला, “ऋतुराज हा जागतिक दर्जाचा आहे, प्रभु देवाच्या डान्स मूव्हज सारख्या सुंदर आहेत. तो फलंदाजी सोपी करण्यासाठी जन्माला आला आहे. जर मला कोणी त्याला दिवसभर नेटवर बॅटिंग करताना पाहण्यासाठी पैसे द्यायला सांगितले, तर मी त्याची फलंदाजी पाहण्यासाठी पैसे देईन.”
ऋतुराज गायकवाड आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग –
विशेष म्हणजे ऋतुराज गायकवाड आयर्लंड दौऱ्यावर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. या दौऱ्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी पार पडला. टीम इंडियाने पावसाने व्यत्यय आणलेल्य सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार २ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पावसामुळे खेळ थांबण्यापूर्वी ऋतुराज गायकवाडने १६ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद १९ धावा केल्या होत्या.
ऋतुराज गायकवाडची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –
२८ जुलै २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत भारतासाठी १० टी-२० आणि 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ऋतुराज गायकवाडला आतापर्यंत सातत्याने संघात स्थान मिळवता आलेले नाही. तो आत-बाहेर होत राहिला आहे.
त्याचबरोबर तो आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्येही तो आपल्या कामगिरीने छाप पाडू शकला नाही. गायकवाडने १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ९ डावात केवळ १९.२५च्या सरासरीने आणि १२३.२ च्या स्ट्राइक रेटने १५४ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने २ वनडेत २७ धावा केल्या आहेत.