R Ashwin Shocking Statement on Ravindra Jadeja IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर चांगलाच दबाव आणला. पहिल्या दिवसाच्या १४४ धावांवर टीम इंडियाने ६ विकेट गमावल्या होत्या, तेव्हा रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी ७व्या विकेटसाठी १९९ धावांची भागीदारी केली आणि संघाच्या पहिल्या डावाची धावसंख्या ३७६ धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अश्विनने ११३ धावांची खेळी केली तर जडेजानेही ८६ धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अश्विनने रवींद्र जडेजाबाबत एक धक्कादायक विधान केले असून त्यात त्याने म्हटले आहे की, मला जडेजाच्या विलक्षण प्रतिभेचा हेवा वाटतो.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस संपल्यानंतर पत्रकार परिषदेत रविचंद्रन अश्विनने जडेजाबद्दल सांगितले की, तो किती प्रतिभावान खेळाडू आहे आणि याचा मला नेहमी हेवा वाटतो. त्याने आपली क्षमता वाढवत त्याने कामगिरी प्रभावी करण्याचे मार्ग शोधले आहेत.

हेही वाचा – Rishabh Pant Century: ऋषभ पंतचे ६३३ दिवसांच्या कमबॅकनंतर दणदणीत शतक, थेट धोनीच्या विक्रमाची केली बरोबरी

जडेबाबद्दल अश्विन म्हणाला, मला रवींद्र जडेजाचा नेहमीच हेवा वाटतो. तो इतका प्रतिभावान खेळाडू आहे. त्याने कायमचं आपल्या कामगिरीत सुधारणा केली आहे. कदाचित मीही रवींद्र जडेजासारखा असतो. पण मी जसा आहे तसा आनंदी आहे. रवींद्र जडेजा हा एक असामान्य क्रिकेटपटू आहे. मी जडेजासाठी खूप खूश आहे. गेल्या काही वर्षांतील त्याची फलंदाजी पाहून खेळात काय सुधारणा करता येऊ शकते हे मला शिकायला मिळाले. आम्ही दोघांनी एकत्र यश मिळवले आहे. अनेक खास कामगिरी केल्या. आम्ही दोघेही एकमेकांच्या यशाचा तितकाच आनंद साजरा करतो.

हेही वाचा – VIDEO: “ओए, सगळेजण झोपलेत का…”, भडकलेल्या रोहितने मैदानात खेळाडूला घातली शिवी, स्टंप माईकमध्ये आवाज रेकॉर्ड

फलंदाजीत चांगली कामगिरी केल्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि जडेजा या जोडीने गोलंदाजीतही बांगलादेशच्या फलंदाजांना अडचणीत आणले. रविचंद्रन अश्विनला पहिल्या डावात एकही विकेट मिळवता आली नसली तरी जडेजाने २ विकेट घेतले. अश्विन म्हणाला की, रवींद्र जडेजा सतत एकाच ठिकाणी चेंडू टाकू शकतो. अश्विन पुढे म्हणाला की तो आणि रवींद्र जडेजा यांनी क्रिकेटमध्ये एकत्र प्रगती केली आहे आणि दोघांनी गोलंदाजीत काही खास गोष्टी केल्या आहेत. यासोबतच दोघेही एकमेकांच्या यशावर आनंदी आहेत.

IND vs BAN: भारताने बांगलादेशला दिले ५१३ धावांचे लक्ष्य

भारताने बांगलादेशला पहिल्या कसोटीत विजयासाठी ५१३ धावांचे लक्ष्य दिले आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात ४ बाद २८७ धावा केल्यानंतर रोहित शर्माने भारताच डाव घोषित केला. यामध्ये ऋषभ पंत आणि शुबमन गिलने शतक झळकावत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. पंतने १२८ चेंडूत ४ षटकार आणि १३ चौकारांसह १०९ धावा केल्या तर गिल १७६ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह ११९ धावा करत नाबाद राहिला.