Ravichandran Ashwin on Rahul Dravid: भारतीय संघाचा ऑफस्पिन फिरकीपटू गोलंदाज रविचंद्रन अश्विनने संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून मिळालेला एक महत्त्वाचा सल्ला उघड केला आहे. अश्विनने सांगितले की, “राहुल द्रविडने त्याला सांगितले होते की, तू तुझ्या कारकिर्दीत किती धावा केल्या आहेत किंवा किती विकेट्स घेतल्या आहेत याने काही फरक पडत नाही. एक खेळाडू म्हणून तुम्ही संघासोबत केलेल्या संस्मरणीय गोष्टी महत्त्वाच्या आहेत.” अश्विनच्या म्हणण्यानुसार, ‘तो त्याच्या करिअरमध्ये त्याच गोष्टी फॉलो करतो.’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रविचंद्रन अश्विनबद्दल बोलायचे तर तो भारतीय संघातील अनुभवी फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे आणि त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या डॉमिनिका कसोटी सामन्यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० विकेट्स पूर्ण केले. हा पराक्रम करणारा तो जगातील १६वा गोलंदाज ठरला आहे आणि हाच विक्रम करणारा तो भारताकडून फक्त तिसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या डॉमिनिका कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी घातक गोलंदाजी करत ५ विकेट्स आपल्या नावावर केल्या. वेस्ट इंडिजने कॅरेबियन संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्यांदा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. यासह तो अनेक दिग्गज अनुभवी गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे.

हेही वाचा: IND vs WI: “मी जर रुसून बसलो तर…”, शानदार कामगिरीनंतर आर. अश्विनचे सूचक विधान, पाहा Video

“खरेतर जेव्हा मी माझ्या कारकिर्दीकडे मागे वळून पाहतो तेव्हा मला आश्चर्य वाटते की ते इतक्या वेगाने कसे गेले. प्रवासात अक्षरशः १४ वर्षे झाली आणि जर तुम्ही आयपीएलचा देखील समावेश केला तर, तो जवळपास १५-१६ वर्षांचा प्रवास आहे. तो कसा गेला मला कळालच नाही,” पहिल्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर अश्विन म्हणाला. अश्विनने हे देखील सांगितले की, भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी वैयक्तिक कामगिरी न पाहता सांघिक आठवणींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याचे “ब्रेनवॉश” केले.

“जेव्हा मी माझ्या कारकिर्दीकडे मागे वळून पाहतो तेव्हा मला आश्चर्य वाटते की ते इतक्या वेगाने माझे करिअरमधील हे वर्ष कसे गेले? मी कुणालाही एवढेच सांगेन की… राहुल द्रविडला जेव्हा मी प्रशिक्षक म्हणून पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्याने हे विधान केले: ‘तुम्ही किती विकेट्स घेता, किती धावा करता हे महत्त्वाचे नाही. तुम्ही त्या सर्व एक दिवस विसरून जाल. एक संघ म्हणून तुम्ही शेअर केलेले किस्से, तयार केलेल्या मजेशीर, आठवणीच तुमच्यासोबत टिकून राहतील.” असे अश्विन पुढे म्हणाला.

हेही वाचा: Sunil Gavaskar: सध्याच्या क्रिकेटपटूंवर सुनील गावसकर भडकले; म्हणाले, “सचिन, द्रविड आणि लक्ष्मण यांनी अहंकार…”

अश्विनने द्रविड बाबतीत पुढे म्हणाला की, “मी  राहुल भाईच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. मला माहित नाही की त्याने माझे ब्रेनवॉश केले आहे की नाही पण माझ्या दृष्टिकोनातून, मला असे वाटते की हा प्रवास इतका लवकर झाला आहे की मला काय करायचे आहे त्यात काय काय घडले ते आठवतच नाही. मात्र जसे खेळतो आहे तसेच पुढे टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत राहीन.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravichandran ashwin mentioned the important advice he received from head coach rahul dravid said that i follow this thing avw