Ravichandran Ashwin tells the story of a strong contender : भारतीय क्रिकेट संघ कोणत्याही आयसीसी स्पर्धेत भाग घेतो, तेव्हा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जाते. अशीच परिस्थिती या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत होणार आहे. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने भारताला प्रबळ दावेदार मानण्याबाबत एक मनोरंजक मुद्दा मांडला. तो म्हणाला की, हे विरोधी संघांचे ‘षड्यंत्र’ आहे. स्वतःवरील दबाव कमी करून भारतावर दबाव आणण्यासाठी ते ही रणनीती अवलंबतात.

अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले, “मला माहित आहे की, क्रिकेट जगतातील लोक म्हणतील की भारत प्रबळ दावेदार आहे. जगभरातील क्रिकेटपटू ही रणनीती म्हणून वापरतात आणि प्रत्येक आयसीसी स्पर्धेपूर्वी भारताचे प्रबळ दावेदार म्हणून नाव सांगतात. त्यांचा दबाव कमी करण्यासाठी आणि आपल्यावर अतिरिक्त दबाव टाकण्यासाठी ते ही रणनीती वापरतात. भारत प्रबळ दावेदारांपैकी एक असू शकतो.”

prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Bhaiyyaji Joshi of RSS said India should become super nation not superpower
भारत सुपरपाॅवर नव्हे, सुपरराष्ट्र होण्याची आवश्यकता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
jitendra awhad sharad pawar (1)
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, भाजपाशी जवळीक वाढल्याची चर्चा; आव्हाड म्हणाले, “आम्ही संघाच्या विचारसरणीचं…”
akhilesh yadav arvind kejriwal
इंडिया आघाडी विसर्जित होणार? केजरीवालांना पाठिंबा देण्यावरून दोन गट; अखिलेश यादव यांनी स्पष्टच सांगितले….
This is nation of Hindus their interests come first says Nitesh Rane
हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे
Hindi is not Indias national language R Ashwins controversial statement video viral
R Ashwin : ‘हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही…’, रविचंद्रन अश्विनच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, VIDEO होतोय व्हायरल

ऑस्ट्रेलिया देखील एक पॉवरहाऊस –

विश्वचषकासाठी इतर प्रबळ दावेदारांबद्दल बोलताना ३६ वर्षीय आश्विन म्हणाला, “ऑस्ट्रेलिया देखील एक पॉवरहाऊस आहे. आम्ही बार्बाडोसमधील दुसऱ्या वनडेतील पराभवाबद्दल बोललो. मी म्हणालो की, आपण टीम इंडियाला सपोर्ट करायला हवा आणि कोणत्याही दबावाशिवाय वर्ल्ड कपमध्ये पाठवायला हवं. बहुतेक लोक सहमत होते, पण टीम इंडिया जिंकली नाही तर काय होईल आणि सर्व काही चाहत्यांवर टाकले जाईल, याविषयी आधीच सावधगिरी बाळगली जात असल्याचे त्यांच्यापैकी काहींचे मत होते.”

हेही वाचा – Ravindra Jadeja: नाडाने २०२३ मध्ये जडेजाची केली सर्वाधिक वेळा डोपिंग चाचणी, विराट-रोहितसह इतर खेळाडूंची कितीवेळा झाली टेस्ट?

कोणीही चाहत्यांना दोष देऊ शकत नाही –

रविचंद्रन अश्विन पुढे म्हणाला, “पाहा, आपण हे समजून घेतले पाहिजे की कोणीही चाहत्यांना दोष देऊ शकत नाही. मलाही समजते. मला म्हणायचे आहे की चाहते हे संघाचे सर्वात महत्त्वाचे हितचिंतक आहेत. चाहते क्रिकेट सामन्याचे संपूर्ण वातावरण बदलू शकतात. प्रत्येक वेळी घरचा संघ वेगात असतो आणि पाठिंबा प्रचंड असतो, तेव्हा इतर संघांसाठी हे काम कठीण असते. मला एवढेच सांगायचे आहे. मला माहित आहे की जेव्हा इतर संघ विमानतळावर किंवा हॉटेलवर येतात, तेव्हा यजमान म्हणून आम्ही नेहमीच स्वागत करतो. याबाबत आपण स्पष्ट असले पाहिजे.”

Story img Loader