R Ashwin Reveals About MS Dhoni : भारतीय संघासाठी तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ‘कॅप्टन कूल’ म्हटले जाते. आपल्या खेळाबरोबर त्याने क्रिकेटच्या मैदानावर आपल्या नम्र वागण्याने चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. आता रविचंद्रन अश्विनने कॅप्टन कूलशी संबंधित एक किस्सा सांगितला आहे, ज्यामध्ये त्याने धोनी एकदा श्रीसंतवर संतापल्याची घटना सांगितली. एमएस धोनीने एस श्रीसंतच्या एका कृतीमुळे त्याला मालिकेदरम्यान भारतात परत पाठवायला सांगितले होते. याबाबत अश्विनने ‘आय हॅव द स्ट्रीट्स-अ कुट्टी क्रिकेट स्टोरी’ या पुस्तकात खुलासा केला आहे.

टीम इंडिया २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होती –

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया २०१०-११ मध्ये, दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होती, जिथे तीन कसोटी, एक टी-२० आणि पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. एकदिवसीय मालिकेतील चौथा सामना पोर्ट एलिझाबेथ येथे खेळला गेला, ज्यामध्ये भारताचा ४८ धावांनी पराभव झाला. या सामन्यादरम्यान धोनी श्रीसंतवर संतापला होता. तो एवढा संतापला होता की त्यानी टीम मॅनेजमेंटला श्रीसंतला दुसऱ्या दिवशीचे परतीचे तिकीट काडून भारतात परत पाठवायला सांगितले.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
aimim akbaruddin Owaisi marathi news
Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…

वास्तविक, अश्विनने सांगितले की, श्रीसंत राखीव खेळाडूंमध्ये होता आणि सामन्यादरम्यान तो संघाच्या डगआउटमध्ये नव्हता तर ड्रेसिंग रूममध्ये होता. धोनीला हे आवडले नाही. अश्विन म्हणाला, “मी मैदानात सामन्यादरम्या पाणी घेऊन गेलो आणि माहीने ते प्याले. दोन षटकांनंतर मी आणखी एकदा पाणी घेऊन गेलो आणि त्याने ते प्यायले. मी पुन्हा तिसऱ्यांदा पाणी घेऊन गेलो, तेव्हा माहीने विचारले, ‘श्री (श्रीसंत) कुठे आहे? हा प्रश्न त्याने सहज विचारला की रागात विचारला मला समजला नाही. त्यामुळे त्याला काय उत्तर द्यावे मला समजतं नव्हते, तरी मी त्याला सांगितले की श्री वरच्या मजल्यावर ड्रेसिंग रूममध्ये आहे.”

हेही वाचा – David Warner : ‘…म्हणून डेव्हिड वॉर्नरला संघातून वगळले’, मुख्य निवडकर्त्याने सांगितले कारण

‘का? तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकत नाही का?’

यानंतर अश्विन पुढे म्हणाला, “धोनीने मला श्रीला सांगायला सांगितले की त्याला खाली येऊन इतर राखीव खेळाडूंसह बसावे लागेल. यावर पाणी देऊन परत येत असताना, मी विचारत करत होतो की, यष्टीरक्षण करताना श्री खाली बसलेला नाही, हे एमएसच्या कसे लक्षात आले? मी परत गेलो आणि कूलिंग ग्लासेस लावलेल्या मुरली विजयला म्हणालो, अरे, मुरली, एमएसने श्रीला खाली यायला सांगितले आहे. यावर मुरली म्हणाला, ‘अरे, तू जाऊन त्याला सांग. माझ्याकडून अशी अपेक्षा करू नको. यानंतर मी ड्रेसिंग रूममध्ये गेलो आणि श्रीशांतला म्हणालो, ‘श्री, एमएसला वाटते की तू खाली येऊन इतर खेळाडूंबरोबर बसावे. यावर श्रीने उत्तर दिले, ‘का? तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकत नाही का?’

‘तो कुठे आहे आणि अजून काय करतोय…’

अश्विन पुढे म्हणाला, “मी श्रीला सांगितले की धोनीला तू खाली यावेसे वाटते. राखीव खेळाडूंनी सामन्यासाठी एकत्र असावे. श्री म्हणाला, ‘ठीक आहे, तुम्ही जा. मी येईन. पुढच्या वेळी हेल्मेट घेऊन मैदानात जायचे होते. यावेळी मला वाटले की एमएस रागावला आहे आणि मी त्याला त्याचा संयम गमावलेला कधीच पाहिले नाही. एमएसने कठोरपणे विचारले, ‘श्री कुठे आहे?’ तो काय करत आहे?’ मी सांगितले तो ड्रेसिंग रूममध्ये मसाज करुन घेत आहे. यावर एमएस काही बोलला नाही. पुढच्या षटकात त्याने मला हेल्मेट परत घेऊन जाईला बोलावले. आता तो शांत झाला होता.”

हेही वाचा – Hardik Pandya : हार्दिक पंड्याचे भव्य स्वागत…खुल्या बसमधून विजयी परेड, बडोद्यातील चाहत्यांच्या गर्दीचा VIDEO व्हायरल

‘मॅनेजरला उद्याचे तिकीट काढायला सांग’

यानंतर अश्विन पुढे म्हणाला, “मला हेल्मेट देताना धोनी म्हणाला, ‘एक काम करं. रणजीब साहेबांकडे जा. त्यांना सांग की श्रीला इथे राहण्यात काही रस नाही. त्यांना उद्याची तिकिट बुक करायला सांग म्हणजे श्रीला माघारी भारतात जाता येईल. हे ऐकून मी स्तब्धच झालो. कारण मला यावर काय बोलावे सुचेना. त्यामुळे मी फक्त त्याच्याकडे बघत होतो. यावर एमएस म्हणाला, ‘काय झालं?’ आता तुला इंग्रजीही कळत नाही?’ यानंतर हे श्रीला समजताच तो पटकन उठला आणि कपडे घालून काही वेळात खाली आला. इतकंच नाही तर पुढच्या वेळी मैदानात पाणी घेऊन जाण्यासाठी तयार होऊन बसला.”