Ravichandran Ashwin reacts to England team: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ॲशेस २०२३ ची सुरुवात पहिल्या कसोटी सामन्यामुळे अतिशय रोमांचक झाली. एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने दोन गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंड संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे पहिला डाव लवकर घोषित करणे, हे सांगितले जात आहे. दरम्यान, आता भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननेही इंग्लंडवर निशाणा साधला आहे.
रविचंद्रन अश्विनच्या मते, इंग्लंड आता पुढच्या वेळी पहिला डाव लवकर घोषित करण्यापूर्वी दोनदा विचार करेल. अश्विनच्या मते, इंग्लंडच्या बेसबॉल रणनीतीची खरी कसोटी २० जूनपासून सुरू होणाऱ्या लॉर्ड्स सामन्यात पाहायला मिळेल. आर आश्विन आपल्या यूट्यूब चॅनलवर २०२३ च्या अॅशेसच्या पहिल्या कसोटी सामन्याबद्दल बोलताना म्हणाला की, “आता इंग्लंड संघाच्या मनात एक शंका नक्कीच दिसेल. मात्र त्यात फारसा बदल दिसणार नाही. पुढच्या वेळी जेव्हा इंग्लंडचा संघ आपला डाव घोषित करेल, तेव्हा निश्चितपणे दोनदा विचार करेल.”
कसोटी क्रिकेटमध्ये तुम्ही काहीही करा, तुम्हाला ते नक्कीच परत मिळेल –
कसोटी क्रमवारीत अव्वल असलेला अश्विन पुढे म्हणाला की, “तुम्ही कसोटी क्रिकेटमध्ये काहीही करा, ते तुम्हाला नक्कीच परत मिळेल. मग ते फायद्याचे असो वा तोट्याचे. आता इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये नक्कीच संशयास्पद परिस्थिती असेल, तर ऑस्ट्रेलियन संघ अधिक आत्मविश्वासाने दिसेल. लॉर्ड्स कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ आता विजयाचा दावेदार म्हणून खेळायला उतरेल.”
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर २८ जूनपासून खेळवला जाणार आहे. एजबॅस्टन कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाच्या विजयात कर्णधार पॅट कमिन्स आणि उस्मान ख्वाजा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता पुन्हा एकदा संघाला या खेळाडूकडून चागंल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने आपला पहिला डाव ८ बाद ३९३ धावांवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिल्या डाव ३८६ धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात २७३ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर २८१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने कांगारूंना विजयासाठी २८१ धावांचे लक्ष्य दिले होते. कर्णधार पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने सामना जिंकला. दोघांनी नवव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाने ८ बाद २८२ धावा करत लक्ष्य गाठले