R Ashwin Statement on Century and How Jadeja Helped during Inning: रविचंद्रन अश्विनने भारतासाठी दमदार कामगिरी करत बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत शतक झळकावले. जिथे भारताचे सर्व फलंदाज फेल ठरले, त्याने रवींद्र जडेजासोबत १९५ धावांची भागीदारी केली आहे. चेन्नई कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात अश्विनने कसोटी क्रिकेटमधील सहावे शतक पूर्ण केले आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली, ज्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ६ शतके झळकावली. अश्विनने १०८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या.

चेन्नई कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाने पहिल्या डावात ६ गडी गमावून ३३९ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये अश्विन १०२ धावांवर नाबाद तर रवींद्र जडेजा ८६ धावांवर नाबाद फलंदाजी करत आहे. आतापर्यंत दोघांमध्ये ७व्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी झाली आहे. शतकानंतर रविचंद्रन अश्विन नेमकं काय म्हणाला, जाणून घ्या.

Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
Rahul gandhi
Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!
amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
aimim akbaruddin Owaisi marathi news
Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
ajit pawar on sharad pawar (1)
“मी आता काय करायचं हे शरद पवारांनी सांगावं”, अजित पवारांची ‘त्या’ विधानावर टिप्पणी; मांडलं ६० वर्षांचं गणित!

हेही वाचा – R Ashwin-Jadeja Partnership: अश्विन-जडेजाने वाचवला सन्मान, विक्रमी भागीदारीसह तोडले अनेक रेकॉर्ड, ठरली नंबर वन जोडी

सहाव्या कसोटी शतकाबाबू आर अश्विन म्हणाला, “घरच्या मैदानावरील प्रेक्षकांसमोर खेळताना एक वेगळीच भावना असते. हे असं मैदान आहे जिथे मी क्रिकेट खेळण्याच मनमुराद आनंद लुटतो. या मैदानाने मला खूप छान आठवणी दिल्या आहेत. मागच्या वेळी जेव्हा मी शतक केले तेव्हा तुम्ही प्रशिक्षक रवीभाई (रवी शास्त्री) होतात, तेही विशेष शतक होतं. कारण तेव्हा मी तमिळनाडू प्रीमियर लीग खेळून आलो होतो. मी माझ्या फलंदाजीवर खूप काम केले आहे. अशा खेळपट्टीवर फलंदाजी करण्याचा थोडा जास्त सराव केला आहे.”

हेही वाचा – IND vs BAN: बांगलादेश कसोटीत रोहित शर्माचा मास्ट्ररस्ट्रोक, तीन विकेट्स गमावल्यानंतरही भारताने कसा सावरला डाव?

पुढे जडेजाबद्दल बोलताना अश्विन म्हणाला, “त्याची (जडेजा) खरी मदत झाली, एक वेळ असा होता की मी खरोखरच घामाने भिजलो होतो आणि थोडा थकलो होतो. जड्डूच्या हे पटकन लक्षात आले आणि मला त्यादरम्यान त्याने चांगले मार्गदर्शन केले. गेल्या अनेक वर्षांमध्ये जड्डू भारतीय संघातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक राहिला आहे. तो आज मैदानात माझ्याबरोबर होता ही खूपच चांगली गोष्ट होती आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दोन धावांच्या जागी तीन धावा काढण्याची गरज नाही, हे त्याने सांगितलं जे माझ्यासाठी खरोखर फायदेशीर ठरलं.”

हेही वाचा – Rishabh Pant: “मला रोखून चेंडू का मारतो आहेस…”, ऋषभ पंत आणि लिट्टन दास मैदानातच भिडले, पाहा VIDEO

चेन्नई कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन फलंदाजीला आला तेव्हा भारतीय संघाने १४४ धावांपर्यंत ६ विकेट गमावल्या होत्या. यानंतर अश्विनने जडेजासह डाव सांभाळण्याचे काम केले आणि धावांचा वेगही वाढवला. अश्विनने सातत्याने खराब चेंडू सीमारेषेपार पाठवण्यात अजिबात हयगय केलीत नाही. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर अश्विनचे ​​कसोटी क्रिकेटमधील हे दुसरे शतक आहे, जे त्याचे घरचे मैदान देखील आहे. अश्विन भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात शतक झळकावणारा ५वा सर्वात वयस्कर खेळाडू आहे.