Dindigul Dragons vs BA XI Trichy Updates: टीम इंडियाचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विन क्रिकेटच्या मैदानावर वेगवेगळे प्रयोग करत असतो. नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाला धावबाद करण्यापासून ते रिटायर्ड आउट होण्यापर्यंत, तो प्रसिद्धीच्या झोतात राहिला आहे. आता तो रिव्ह्यू घेतल्यामुळे चर्चेत आला आहे. हा प्रकार तामिळनाडू प्रीमियर लीग २०२३ मध्ये पाहिला मिळाला आहे. डिंडीगुल ड्रॅगन्स आणि बीए इलेव्हन त्रिची यांच्यातील सामन्यादरम्यान अश्विनने हे केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्रिचीच्या डावाच्या १३व्या षटकात आर राजकुमारला रविचंद्रन अश्विनने कॉट बीहाइंड आउट केले. फलंदाजाने लगेच रिव्ह्यू घेतला. चेंडू बॅटला लागला नाही म्हणून तिसऱ्या पंचाने मैदानावरील पंचांना आपला निर्णय बदलण्यास सांगितले. बॅट जमिनीवर आदळल्यामुळे आवाज आला होता.

अश्विनने निर्णय बदलल्यानंतर घेतला निर्णय –

हा निर्णय बदलल्यानंतर अश्विनने रिव्ह्यू घेतला आणि मैदानावरील पंचांशी संवाद साधताना दिसला. बॅट जमिनीवरच नाही तर चेंडूलाही लागली, असे तो म्हणत होता. मात्र, तिसरे पंच आपल्या निर्णयावर ठाम राहिले. तत्पूर्वी, अश्विनने सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवर त्रिचीच्या डॅरिल फेरारियोची विकेट घेतली. तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२३ मध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता. इंग्लंडमधील ओव्हल स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया टीम इंडिया हरवून चॅम्पियन बनली.

हेही वाचा – Arjun Tendulkar: सचिनच्या मुलाला BCCIचे खास आमंत्रण! तीन आठवड्यांच्या स्पेशल ट्रेनिंगनंतर अर्जुन करणार टीम इंडियात प्रवेश?

रविचंद्रन अश्विनने रिव्ह्यूला का केले रिव्ह्यू –

सामना संपल्यानंतर रविचंद्रन अश्विनने सांगितले की त्याने रिव्ह्यू का घेतला? तो म्हणाला, “स्क्रीनकडे पाहून मला वाटले की आऊट आहे. या स्पर्धेत डीआरएस नवीन आहे. काठावर असताना, चेंडू बॅटला लागण्यापूर्वी अल्ट्राएजवरील स्पाइक सहसा दिसून येतो. काठाला लागले असताना, चेंडू बॅटला लागण्यापूर्वी अल्ट्राएजवरील स्पाइक सहसा दिसून येतो. मैदानावरील पंचाचा निर्णय रद्द करण्यासाठी निर्णायक पुरावे असणे आवश्यक आहे. त्यांनी तो निर्णय बदलला, मला थोडाही आनंद झाला नाही. त्यामुळे पंच वेगळ्या कोनातून पाहू शकतील, या आशेने मी रिव्ह्यू घेतला.”

अश्विनच्या नेतृत्वाखालील डिंडीगुल ड्रॅगन्सने त्रिचीचा ६ गडी राखून पराभव केला. संघाने १२२ धावांचे लक्ष्य ३१ चेंडू आणि ६ गडी गमावून पूर्ण केले. अश्विनने २ बळी घेतले. तर वरुण चक्रवर्तीने ३ बळी घेतले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravichandran ashwin takes review on review against ba xi trichy in tnpl 2023 vbm