Ravichandran Ashwin on Team India: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी२० मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. लॉडरहिल येथे झालेल्या शेवटच्या टी२० सामन्यात सूर्यकुमार यादव हा एकमेव फलंदाज होता ज्याच्या ६५ धावांच्या खेळीने संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात फार खराब झाली त्यामुळे संपूर्ण जबाबदारी ही मिडल ऑर्डरवर आली. यावरच आता भारताचा स्टार फिरकीपटू अश्विनने फलंदाजीबाबत संघ व्यवस्थापनाला उपरोधिक टोमणा मारला आहे.

अश्विन त्याच्या युट्युब चॅनेलवर बोलताना म्हणाला, “संघाच्या फलंदाजीत डेप्थ नाही ही सत्य परिस्थिती आहे. पाचवी विकेट पडताच गोलंदाज फलंदाजीसाठी खेळपट्टीवर दिसले. फलंदाजीमध्ये फार डेप्थ नसताना, आता आपण याबाबत अधिक विचार करायला हवा. जर वरील पाच ते सहा फलंदाज काही करू शकले नाही तर सात आणि आठ क्रमांकावर असणारे खेळाडू सामना जिंकवून देऊ शकत नाही.” संघाचा वरिष्ठ गोलंदाज रविचंद्रन अश्विनने विश्वचषक आणि आशिया चषक स्पर्धेत आठव्या क्रमांकावर भारताच्या कोणत्या खेळाडूने मैदानात उतरावे, याबाबत उपरोधिक सल्ला दिला.

IND vs AUS Paine criticism of Gautam Gambhir ahead Border Gavaskar Trophy
IND vs AUS : ‘… तो भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही’, रिकी पॉन्टिंगनंतर टिम पेनने गौतम गंभीरवर साधला निशाणा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!
Rahul gandhi
Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!
Gautam Gambhir Statement on Ricky Ponting Over Virat Kohli Rohit Sharma Criticism Said What does Ponting to has to do with Indian cricket
Gautam Gambhir: “पॉन्टिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? त्याने तर…”; रोहित-विराटबद्दल केलेल्या वक्तव्यावर गंभीर संतापला

२००६ नंतर पहिल्यांदाच भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका गमावली आहे. या पराभवानंतर संघाचे स्वरूप आणि उपलब्ध पर्यायांवर चर्चा केली जाईल, असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितले. “फलंदाजीमध्ये डेप्थ शोधणे हे एक क्षेत्र असे आहे ज्यावर आम्ही लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही आमच्याकडून शक्य तितके सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे गोलंदाजी आक्रमण कमी न करता फलंदाजीमध्ये सखोलता कशी येईल हे आम्ही पाहत आहोत. आम्हाला खास करून अष्टपैलू खेळाडूची गरज आहे.”

हेही वाचा: Irfan Pathan: ‘बेगानी शादी में…’, इरफान पठाणने ट्वीट करून पाकिस्तानी चाहत्यांना दिले चोख प्रत्युत्तर, आशिया कपआधी माइंड गेम सुरु

राहुल द्रविड पुढे म्हणाला की, “वरच्या फळीतील फलंदाज लगेच बाद होताच भारतीय संघाची लय बिघडते त्यामुळे मिडल ऑर्डर आणि तळाच्या फलंदाजांवर जबाबदारी येते. यामुळे टीम इंडिया अडचणीत येऊ शकतो. श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुलने संघात पुनरागमन केले तर आमच्याकडे खेळण्यासाठी अव्वल सात खेळाडू असतील. ज्यामध्ये हार्दिक आणि जडेजा यांचा अष्टपैलू म्हणून समावेश केला जाईल, तर कर्णधार रोहित, शुबमन गिल आणि विराट कोहली यांचा टॉप ऑर्डरमध्ये समावेश असेल.” यावर बोलताना अश्विन म्हणाला की, “द्रविड म्हणतात ती अडचण दूर करणे गरजेचे आहे. आठव्या क्रमांकावर स्थिरावलेल्या खेळाडूबाबत देखील अष्टपैलू असावा हा निकष असावा. मात्र, त्याचे संघातील स्थान निश्चित असावे.” असे म्हणत त्याने स्वतःच्या नावाचा विचार करावा, असे अप्रत्यक्षपणे सांगितले.

अश्विनने अलीकडेच यूट्यूब चॅनलवर बोलताना शार्दुल ठाकूरला आठव्या क्रमांकावर खेळवावे असा सल्ला दिला होता. तो म्हणाला की, “तुम्हाला तुमची टेल एवढ्या लवकर सुरू व्हायला नको आहे आणि म्हणूनच तुम्हाला शार्दुल ठाकूर सारख्या व्यक्तीची गरज आहे. जो आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येताच काही चेंडूंचा सामना करू शकेल. पण सामना जिंकण्यासाठी तुम्हाला तुमचे सर्वोत्तम फलंदाज आणि गोलंदाज मैदानात उतरवावे लागतील. तसेच, जर तुम्ही सहा विकेट्सवर असता तेव्हा तुम्हाला ३० चेंडूत जिंकण्यासाठी ३६ धावा हव्या असतील तर अशा प्रसंगी खेळ संपवण्याची क्षमताही तुमच्यात असायला हवी.”

हेही वाचा: Independence Day: ‘भारत हमको जान से प्यारा…’, भारतीय क्रिकेटपटूंनी केलेल्या ७७व्या स्वातंत्र्यदिनाचे सेलिब्रेशन तुम्ही पाहिले का?

अश्विन पुढे म्हणाला की, “जर त्याने कुलदीप आणि चहलला एकत्र खेळवलं तर अशी परिस्थिती निर्माण होईल की कुलदीपला ८व्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागेल.” आशिया कप आणि विश्वचषक संघ निवडीपूर्वी अश्विनने ही सूचना केली आहे. लवकरच भारतीय संघही त्याची घोषणा करणार आहे. टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पराभवानंतर, भारतीय संघ व्यवस्थापनाला फलंदाजीतील डेप्थ वाढवण्याची चिंता सतावते आहे.