भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनसाठी इंग्लंडविरुद्धची धरमशाला कसोटी खास असणार आहे. ही कसोटी अश्विनची १००वी कसोटी असणार आहे. या सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत अश्विनने त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रकार परिषदेत अश्विनने आपल्या १०० व्या कसोटीपर्यंतच्या प्रवासातील काही आठवणींना उजाळा दिला. या पत्रकार परिषदेत रविचंद्रन अश्विनने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील नेमका टर्निंग पॉईंट काय ठरला याबद्दल सांगितले. ‘२०१२ मध्ये इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता. इंग्लंडविरुद्धची ती कसोटी मालिका माझ्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरली. ज्यामुळे मला चुका सुधारण्यास मदत झाली’, असं अश्विन म्हणाला. अश्विनने त्या मालिकेत ५२.४६ च्या सरासरीने तब्बल ७३७ धावा दिल्या.अॅलिस्टर कूक आणि पीटरसनच्या धुवांधार फलंदाजीमुळे त्या मालिकेत तीनवेळा त्याच्या गोलंदाजीवर शंभरहून अधिक धावा लुटण्यात आल्या. या कामगिरीमुळे अश्विनच्या कसोटी संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होतं, इंग्लंडने भारताच्या भूमीवर ही मालिका २-१ ने जिंकली, जो इंग्लिश संघासाठी भारतातील १९८४-८५ नंतरचा पहिला मालिका विजय होता.

अश्विनने आपल्या १००व्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘२०१२ ची इंग्लंडविरुद्धची मालिका माझ्यासाठी टर्निंग पॉइंट होती. मला कुठे सुधारणा करायची हे त्या मालिकेने मला शिकवले.’ पण नंतर अश्विनच्या फिरकीने मात्र भारतीय कसोटी संघात त्याचे अढळ स्थान निर्माण केले. अश्विनने याच मालिकेत ५०० कसोटी विकेट्सचा टप्पा पूर्ण केला.

१०० वा कसोटी सामन्याबद्दल अश्विन म्हणाला,’हा खूप खास प्रसंग आहे. १०० व्या कसोटी सामन्यापेक्षाही माझा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खास होता. मात्र, १०० वा कसोटी सामना असला तरी त्यासाठी माझ्या तयारीत कोणताही बदल झालेला नाही.आम्हाला धरमशाला कसोटी जिंकायची आहे’ .

त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला, ‘मी २०१८-१९ मध्ये बर्मिंगहॅममधील कसोटीत कारकिर्दीतील सर्वोत्तम स्पेल टाकला होता.’ नुकताच ५०० कसोटी विकेट पूर्ण करणारा अनिल कुंबळेनंतरचा दुसरा भारतीय गोलंदाज ठरलेल्या अश्विनने २०११ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

या भारताच्या सर्वोत्कृष्ट फिरकीपटूने त्याच्या या प्रवासात कुटुंबाच्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले, ‘माझ्या मुली माझ्यापेक्षा जास्त उत्साहित आहेत. शंभरावी कसोटी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, परंतु माझ्या वडिलांसाठी, आईसाठी, पत्नीसाठी आणि अगदी माझ्या मुलांसाठी ती अधिक महत्त्वाची आहे. माझी मुलं या १०० व्या कसोटीसाठी अधिक उत्सुक आहेत’.

अश्विन म्हणाला, ‘खेळाडूच्या वाटचालीत कुटुंबाला खूप काही सहन करावे लागते. तुमच्या मुलाने या क्रिकेट कारकिर्दीत काय काय केले याची उत्तरे देण्यासाठी माझे वडील अजूनही ४० कॉल्सना उत्तरे देतात’.

रवीचंद्रन अश्विन हा भारतासाठी मायदेशातील कसोटीत सर्वात मोठा सामनाविजेता ठरला आहे. गोलंदाजीच्या बरोबरीने फलंदाजीतही त्याने योगदान दिलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनने ५ शतकं झळकावली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravichandran ashwin who is going to play 100th test at dharamashala talks about turning point in his career bdg99
Show comments