Reply to Narendra Modi’s Fake Account: बुधवारी (२३ ऑगस्ट) चांद्रयान-3 सह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरणारा भारत हा पहिला देश ठरला. प्रत्येक भारतीयाने हा क्षण साजरा केला. त्याचवेळी प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूने या यशाचा आनंद साजरा केला. आयर्लंडमध्ये खेळण्यासाठी गेलेल्या टीम इंडियापासून ते भारतात उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला. चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर भारतीय ऑफस्पिनर आर अश्विनने देखील ट्विटरवर एक पोस्ट पोस्ट केली होती.
ज्यामध्ये त्याने इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले होते, परंतु अश्विनचा आनंद द्विगुणित झाला, जेव्हा त्याच्या ट्विटला ‘पीएम मोदी’ च्या अकाउंटला रिप्लाय मिळाला.आर अश्विनच्या ट्विटवर @NarendraModiPa नावाच्या ट्विटर हँडलवरून हे उत्तर आले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, “प्रत्येक भारतीयाचे अभिनंदन, ही कामगिरी केल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.” हे ट्विट पाहून आर अश्विनचा आनंद चौपट झाला, पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण त्यानंतर चाहत्यांनी हे फेक अकाऊंट असल्याच्या कमेंट करायला सुरुवात केली.
रविचंद्रन अश्विननेही घेतली मजा –
यानंतर अश्विननेही मजा घेतली आणि पीएम मोदींच्या त्या फेक अकाउंटला रिप्लाय देताना म्हणाला, “सर कसे आहात? तुम्ही माझ्या ट्विटला उत्तर दिल्याबद्दल मला खूप आनंद झाला. मला अभिमान वाटला.” खरं तर, अश्विनने त्या चाहत्यांसाठी आनंदाने अभिनय केला, जे सेलिब्रिटींच्या उत्तरासाठी त्याचे आभार मानतात.
पंतप्रधानांच्या फेक अकाऊंटलाही मिळाली आहे ब्लू टिक –
ज्या अकाऊंटवरून अश्विनच्या ट्विटला रिप्लाय देण्यात आला. त्या अकाऊंटवर ब्लू टिक आहे. तसेच नरेंद्र मोदींच्या समोर पॅरोडी लिहिले आहे. या ट्विटर अकाउंटला ८१२ फॉलोअर्स आहेत आणि १२७ लोकांना या अकाउंटने फॉलो केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या अकाउंटला ब्लू टिक आहे.
हेही वाचा – Virat Kohli: आशिया कपपूर्वी यो-यो टेस्ट पास झाल्यानंतर किंग कोहली दिसला आनंदी, जाणून घ्या किती केला स्कोअर
चंद्रावर पोहोचणारा भारत ठरला चौथा देश –
विशेष म्हणजे चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. यापूर्वी अमेरिका, चीन आणि रशिया चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहेत. त्याच वेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. उल्लेखनीय म्हणजे, २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 ने संध्याकाळी ६.०४ वाजता सॉफ्ट लँडिंग केले होते.