हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघात जागा मिळालेल्या रविंद्र जाडेजाने दुसऱ्या सामन्यात आपल्या नावावर एका विक्रमाची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर सर्व फलंदाज माघारी परतत असताना, रविंद्र जाडेजाने अखेरच्या फळीत विराट कोहलीला साथ देत 21 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान जाडेजाने कपिल देव आणि सचिन तेंडुलकर या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. वन-डे क्रिकेटमध्ये 2 हजार धावा आणि 150 विकेट घेणारा जाडेजा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजानी शिस्तबद्ध मारा करत भारतीय संघाला 250 धावांवर रोखलं. विराट कोहलीने झळकावलेलं शतक हे भारतीय डावाचं वैशिष्ट्य ठरलं.

अवश्य वाचा – IND vs AUS : जाणून घ्या विराटने झळकावलेल्या शतकाचं ‘नागपूर कनेक्शन’

Story img Loader