पोर्ट ऑफ स्पेनमध्ये शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिरंगी क्रिकेट स्पध्रेतील सामन्यादरम्यान भारतीय खेळाडू रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना यांच्यात मैदानावरच जुंपली. विंडीजच्या फलंदाजीप्रसंगी जडेजाच्या २६व्या आणि ३२व्या षटकात रैनाने झेल सोडले. त्यामुळे अष्टपैलू खेळाडू जडेजाचा पारा चढला.
२६व्या षटकात केमार रोचचा फटका यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या ग्लोव्हजला लागून स्लिप आणि गलीच्या मधोमध पडल्याची पहिली घटना घडली. त्यानंतर ३२व्या षटकात सुनील नरिनने मारलेला फटका लाँग ऑनला झेलताना भुवनेश्वर कुमार आणि रैना यांचा अंदाज चुकला. मग पुढच्याच चेंडूवर नरिनने लाँग ऑनलाच षटकार खेचला. त्यानंतर जडेजा रैनावर भडकला आणि त्यांच्यात वादावादी झाली. कर्णधार विराट कोहलीने मध्यस्थी करून हा वाद मिटवला.

Story img Loader