IND vs ENG Ravindra Jadeja breaks James Anderson’s record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार बटलर आणि बेथलच्या अर्धशतकाच्या जोरावर दोनशे धावांचा टप्पा पार केला. मात्र भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत इंग्लंडला ४७.४ षटकांत २४८ धावांवर गुंडाळले. यादरम्यान फिरकीपटू रवींद्र जडेजाने मोठा पराक्रम केला. त्याने जेम्स अँडरसनचा विक्रम मोडत इतिहास घडवला आहे.
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे एकदिवसीय मालिकेत इतिहास घडवला आहे. तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. यादरम्याने त्याने जेम्स अँडरसनच्या विक्रम मोडला आहे. याआधी हा विक्रम जेम्स अँडरसनच्या नावावर होता. ज्याने ४० विकेट्स घेतल्या होत्या. मात्र आता रवींद्र जडेजाने ४१ विकेट्स घेत त्याला मागे टाकले.
भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक विकेट्स:
१ – रवींद्र जडेजा : २७ सामन्यात ४१ विकेट्स
२ – जेम्स अँडरसन: ३ सामन्यात ४० विकेट्स
३ – अँड्र्यू फ्लिंटॉफ: ३० सामन्यांत ३७ विकेट्स
४ – हरभजन सिंग : २३ सामन्यात ३६ विकेट्स
५ – जवागल श्रीनाथ: २१ सामन्यात ३५ विकेट्स
रवींद्र जडेजाच्या ६०० विकेट्स पूर्ण –
संपूर्ण सामन्यात रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी केली. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तो लयीत दिसत आहे. त्याने नागपूर एकदिवसीय सामन्यात ९ षटके टाकली आणि २.९ च्या इकॉनॉमीने फक्त २६ धावा देऊन ३ बळी घेतले. जो रूटसोबतच त्याने जेकब बेथेल आणि आदिल रशीदलाही आपले बळी बनवले. यादरम्यान त्याने एक मेडन ओव्हरही टाकला. यासोबतच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६०० विकेट्सही पूर्ण केल्या आहेत. या सामन्यापूर्वी त्याने ५९७ विकेट घेतल्या होत्या.