Ravindra Jadeja could be ruled out of the five Test series : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. याबाबत बीसीसीआयने सोमवारी माहिती दिली होती. पण आता भारतीय संघासाठी एक वाईट बातमी येत आहे. रिपोर्ट्समध्ये असे बोलले जात आहे की, जडेजा फक्त एक सामना नाही तर संपूर्ण मालिकेतून बाहेर असू शकतो. त्याचे कारण त्याची दुखापत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवींद्र जडेजा मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता –

टीओआयनुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की राहुल या मालिकेत नंतर पुनरागमन करू शकतो, परंतु जडेजाची दुखापत अधिक गंभीर असू शकते. सूत्राने सांगितले की, एनसीएचे वैद्यकीय पथक काय म्हणते ते पाहूया. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जडेजाच्या पायाच्या स्नायूला दुखापत झाली होती, तर राहुलने उजव्या मांडीत दुखत असल्याने तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. या दोघांवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. अशाच मांडीच्या दुखापतीमुळे राहुल गेल्या वर्षी तब्बल ४ महिने क्रिकेटपासून दूर राहिला होता. त्याच्यावर जर्मनीत शस्त्रक्रियाही झाली होती.

या खेळाडूंना संघात स्थान मिळाले –

इंग्लंडने पहिला कसोटी सामना २८ धावांनी जिंकला होता. आता दुसरा कसोटी सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी बीसीसीआयने सोमवारीच आपल्या निवेदनात म्हटले होते की, जडेजा आणि राहुल दोघेही जखमी आहेत. याच कारणामुळे त्यांना दुसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी भारतीय बीसीसीसीआयने सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा संघात समावेश केला आहे. त्याचबरोबर आवेश खानही संपर्कात राहणार आहे.

हेही वाचा – Rishabh Pant : ‘मला वाटले होते या जगातील माझी वेळ…’, ऋषभने कार अपघातावर दिली प्रतिक्रिया

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravindra jadeja could be ruled out of the five test series against england due to a leg injury vbm
Show comments