चेन्नई सुपरकिंग्जने रवींद्र जडेजा आणि हरभजनसिंग यांच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर शनिवारी झालेल्या आयपीएल लढतीत रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघावर ६ गडी राखून सहज विजय मिळवला. सामन्यात जडेजाने शानदार गोलंदाजी करताना ४ षटकांमध्ये केवळ १८ दावा देऊन तीन गडी बाद केले. त्याने घेतलेल्या तीन विकेटपैकी एक विकेट विराट कोहलीची होती. जडेजाने कोहलीला क्लीन बोल्ड केलं, मात्र कोहलीला बाद केल्याचं कोणतंही सेलिब्रेशन रविंद्र जडेजाने केलं नाही. कोहलीसारखी मोठी विकेट घेतल्यानंतरही जडेजाने कोणताच आनंद चेह-यावर न दाखवल्याने उपस्थित प्रेशक, दर्शक आणि समालोचकही हैराण झालेले पाहायला मिळाले.

बंगळुरूच्या फलंदाजीदरम्यान चेन्नईचा कर्णधार धोनीने रविंद्र जडेजाकडे सातवं षटक टाकण्याची जबाबदारी दिली. त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अनपेक्षितपणे विराट कोहली क्लीन बोल्ड झाला. जडेजाने टाकलेल्या सरळ चेंडूवर चकल्यामुळे खुद्द कोहलीही हैराण झाला. पण कोहलीला बाद केल्याचा आनंद साजरा करण्याच्या प्रयत्नात असतानाच जडेजाची नजर कोहलीवर जाते आणि तो त्याचं सेलिब्रेशन टाळतो. मैदानावरील कॅमे-यांमध्ये कैद झालेलं हे दृष्य काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि युजर्सनी जडेजाची खिल्ली उडवायला सुरूवात केली. किमान भारतीय कसोटी संघात परतता यावं यासाठी जडेजाने स्वतःला सेलिब्रेशन करण्यापासून रोखलं, असे एकाहून एक हास्यास्पद ट्विट युजर्सकडून केले जात आहेत.
पाहा व्हिडीओ –

Story img Loader