भारताचा फिरकी गोलंदाज रविंद्र जाडेजा नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत फारशी कमाल दाखवू शकला नसला तरी सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. रविंद्र जडेजाला वरदक्षिणा म्हणून सासरच्यांकडून मिळालेली ऑडी क्यू ७ अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. जाडेजा येत्या १७ एप्रिलला रिवा सोळंकीशी विवाहबद्ध होणार आहे. तत्पूर्वी रिवाच्या वडिलांनी प्रथेनुसार नवऱ्या मुलाला देण्यात येणारी वरदक्षिणा म्हणून जाडेजाला ९० लाखांची ऑडी भेट दिली. रिवाचे वडील हरदेवसिंग सोळंकी हे स्थानिक कंत्राटदार असून ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. तर, रिवाची आई रेल्वेमध्ये कामाला आहे. जाडेजाची भावी पत्नी रिवाने राजकोटच्या शोरुममधून ही कार ताब्यात घेतली. सासरच्या मंडळींनी दिलेल्या या अनपेक्षित भेटीने जड्डूचा चेहरा चांगलाच खुलला होता.
spt-jadeja-audi-07-748x400

Story img Loader