Ravindra Jadeja surpasses Ishant and Zaheer in taking most Test wickets for India : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना शुक्रवारपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी मिळवणाऱ्या न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेत मोठा पराक्रम केला आहे. त्याने हा पराक्रम करताना इशांत शर्मा आणि झहीर खानला मागे टाकले आहे.
वानखेडे मैदानावर रवींद्र जडेजाने किवी फलंदाजांना अडचणीत आणले आहे. जड्डूने आतापर्यंत दोन सत्रात तीन विकेट्स घेतल्या आहेत. जडेजानेही चहाच्या विश्रांतीपूर्वी ग्लेन फिलिप्सला बाद करून विशेष कामगिरी केली आहे. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत जडेजा आता पाचव्या स्थानावर आला आहे. जड्डूने झहीर खान आणि इशांत शर्मा या दोघांनाही मागे टाकले आहे.
रवींद्र जडेजाने केला मोठा पराक्रम –
रवींद्र जडेजाने वानखेडेवर ग्लेन फिलिप्सची विकेट घेत महान खेळाडूंच्या यादीत आपले नाव सामील केले आहे. जड्डू आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे. जडेजाने या प्रकरणात झहीर खान आणि इशांत शर्माला मागे टाकले आहे. जड्डूच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये ३१२ विकेट्स आहेत. त्याचबरोबर झहीर आणि इशांतने क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये ३११ विकेट घेतल्या आहेत. भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज अनिल कुंबळे (६१९) आहे.
u
वानखेडेवर चालली जड्डूची जादू –
वानखेडे मैदानावर रवींद्र जडेजाच्या फिरकीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज लोटांगण घालताना दिसले. जडेजा किवी फलंदाजांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. वृत्त लिहेपर्यंत तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकीपटूने न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. जडेजाने एकाच षटकात विल यंग आणि टॉम ब्लंडेलचा डाव संपवला. यंगला ७१ धावांवर जड्डूने बाद केले. त्याचबरोबर ब्लंडेलला आपले खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी ग्लेन फिलिप्सला १७ धावांवर जडेजाने बाद केले. जडेजाचा फिरकी समजण्यात फिलिप्स पूर्णपणे अपयशी ठरला आणि चेंडू त्याच्या बॅट आणि पॅडमधून गेला आणि स्टंपवर आदळला.
रवींद्र जडेजाने घेतल्या पाच विकेट्स –
रवींद्र जडेजाने या डावात दुसऱ्यांदा एका षटकात दोन विकेट्स घेतले. त्याने किवी डावाच्या ६१ व्या षटकात ईश सोधी आणि मॅट हेन्री यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सोधी एलबीडब्ल्यू आऊट झाला, तर हेन्री त्रिफळाचीत झाला. सोधीने सात धावा केल्या, तर हेन्रीला खातेही उघडता आले नाही. सध्या डेरिल मिशेल आणि एजाज पटेल क्रीजवर आहेत. न्यूझीलंडने आठ गड्यांच्या मोबदल्यात २१७ धावा केल्या आहेत.