Ravindra Jadeja Instagram Post on Retirement Speculation: रवींद्र जडेजाने विजयी चौकारासह भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयावर शिक्कामोर्तब केला. टीम इंडियाचा अष्टपैलू फिरकीपटू रवींद्र जडेजाने आपले नाव इतिहासाच्या पानांवर नोंदवले आहे. एमएस धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यानंतर आयसीसीचे तिसरे विजेतेपद पटकावणारा आता खेळाडू बनला आहे. जडेजाने कारकिर्दीत दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. २०१३ मध्येही तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेत्या संघाचा भाग होता. पण यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर जडेजा निवृत्त होणार असल्याची जोरदार चर्चा होती, यावर जडेजा पोस्ट शेअर करत उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवींद्र जडेजाला १२ वर्षांपूर्वी सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. ३५ वर्षीय अष्टपैलू जडेजाने २०२५ च्या फायनलमध्ये पाठलाग करताना विजयी चौकार मारला आणि संघाला विजयापर्यंत नेले. दुबईच्या खेळपट्टीसाठी टीम इंडियाने जे फिरकी आक्रमण तयार केले होते, त्यात जडेजा महत्त्वाचा भाग होता. भारतीय संघ या स्पर्धेत एकूण ४ फिरकीपटूंउतरला होता. डावखुरा फिरकीपटूने ५ सामन्यात ४.३५ च्या इकॉनॉमीसह ५ विकेट घेतले.

जडेजाने टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यावेळेस विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनीही निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकल्यानंतर रोहित, कोहली आणि जडेजा निवृत्त होणार असल्याचे बोलले जात होते. पण असे झाले नाही. रोहित आणि कोहलीने निवृत्ती घेण्यास नकार दिला. तर आता रवींद्र जडेजानेही सोशल मीडियावर चार शब्दांत आपण निवृत्ती घेणार नसल्याचे सांगितले आहे.

रवींद्र जडेजाची इन्स्टाग्राम पोस्ट

जडेजा त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हणाला, “विनाकारण कोणत्याही अफवांवर पसरवू नका, धन्यवाद”. जडेजाच्या या पोस्टसह आता तो निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जडेजा हा प्रत्येक फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. २००९ पासून आतापर्यंत त्याने प्रत्येक फॉरमॅटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. आगामी काळात एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्येही त्याची चांगली कामगिरी पाहायला मिळेल.