Ravindra Jadeja vs West Indies ODI Highest wicket taker: भारत आणि वेस्ट इंडिज संघांत सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी पार पडला. पहिल्या सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघाचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेत एका मोठ्या विक्रमाला गवसनी घातली. त्याने हा पराक्रम करताना कपिल देव आणि अनिल कुंबळे यांना मागे टाकले आहे.

या सामन्यात टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला आणि वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या २३ षटकांत ११४ धावांत सर्वबाद झाला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर अनेक मोठे विक्रम मोडीत काढले. त्यानंतर भारतीय संघाने प्रत्युत्तरात २२.५ षटकांत ५ विकेट्स गमावून ११८ धावा करत विजय नोंदवला.

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
IND vs AUS Sam Konstas Statement on Fight With Virat Kohli at Melbourne Test Watch Video
IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
IND vs AUS boxing day test 2024
IND vs AUS : रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून दाखवला बाहेरचा रस्ता
Mohammed Shami Fitness Update BCCI Informs He Recovered From Injury But Not Fit for IND vs AUS Last 2 Matches
Mohammed Shami: मोहम्मद शमी दुखापतीतून सावरला…, BCCI ने दिली मोठी अपडेट; ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही? जाणून घ्या

रवींद्र जडेजाने रचला इतिहास –

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रवींद्र जडेजाने इतिहास रचला आहे. जडेजा आता वेस्ट इंडिजविरुद्ध भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. जडेजाच्या आता वेस्ट इंडिजविरुद्ध ४४ विकेट्स आहेत. त्याने माजी भारतीय कर्णधार कपिल देव (४३) यांना मागे टाकले आहे. त्याचवेळी जडेजाने याच सामन्यात ४१ बळी घेणाऱ्या अनिल कुंबळेलाही मागे टाकले.

हेही वाचा – Deodhar Trophy 2023: रियान परागने रचला इतिहास, तब्बल ‘इतके’ षटकार लगावत मोडला युसूफ पठाणचा विक्रम

शमी आणि हरभजनचेही नाव यादीत –

याशिवाय मोहम्मद शमीचे नावही या यादीत आहे. शमीने वेस्ट इंडिजविरुद्ध ३७ विकेट घेतल्या आहेत. या यादीत पाचवे नाव हरभजन सिंगचे आहे. हरभजनने वेस्ट इंडिजविरुद्ध एकूण ३३ विकेट घेतल्या आहेत. या यादीत जडेजा अव्वल असून आता या मालिकेत आणखी दोन सामने बाकी आहेत. अशा स्थितीत जड्डूला आपली आघाडी आणखी वाढवण्याची चांगली संधी आहे.

एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –

४४- रवींद्र जडेजा<br>४३- कपिल देव
४१- अनिल कुंबळे
३७- मोहम्मद शमी<br>३३- हरभजन सिंग

हेही वाचा – Bhuvneshwar Kumar: टीम इंडियाच्या गोलंदाजाने घेतला मोठा निर्णय! इन्स्टाग्राम बायोमधून हटवला ‘तो’ शब्द

टीम इंडियाची शानदार गोलंदाजी –

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर जडेजानेही ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार आणि हार्दिक पांड्या यांनी १-१ विकेट घेतली.

Story img Loader