Ravindra Jadeja Instagram post for Late Mother: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि बेस्ट फिल्डर म्हणून जगभरात ख्याती असलेल्या रवींद्र जडेजाने इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. जडेजाने आपल्या दिवंगत आईला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. जडेजाने सोशल मीडियावर एक स्केचचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो टी-२० विश्वचषक हातात घेऊन त्याच्या आईच्या शेजारी उभा आहे. जडेजा टी-२० विश्वचषक विजेत्या चॅम्पियन संघाचा भाग होता.
हेही वाचा – Sri Lanka: धक्कादायक! श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची हत्या, पत्नी आणि मुलांसमोर घरात झाडल्या गोळ्या
रवींद्र जडेजाने भावुक पोस्टसह आईला वाहिली श्रध्दांजली
केन्सिंग्टन ओव्हल येथे झालेल्या रोमहर्षक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने विजेतेपदाची १७ वर्षांची प्रतीक्षा संपवली. जडेजाने या विजयानंतर त्याच्या आईसाठी ही भावुक पोस्ट केली आहे. २००५ साली जडेजाच्या आईचे निधन झाले. त्यावेळी जडेजा १७ वर्षांचा होता आणि तो भारताच्या अंडर-१९ संघाचा भाग होता.
हेही वाचा – Natasa Stankovic: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान नताशा स्टॅनकोविकने लेकासह सोडलं घर, एअरपोर्टवरील VIDEO आला समोर
भारताने टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद जिंकल्यानंतर जडेजाने आपल्या आईप्रति प्रेम व्यक्त करणारी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की आज मी मैदानावर जे काही करत आहे, ती तुझ्यासाठी श्रद्धांजली आहे.
भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर जडेजाने आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. त्याने एका भावनिक पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर जडेजाने सोशल मीडियावर लिहिले की, ‘कृतज्ञतापूर्वक भावनेने मी टी-२० आंतरराष्ट्रीयला निरोप देतो. मी माझ्या देशासाठी नेहमीच माझे सर्वोत्तम दिले आहे आणि इतर फॉरमॅटमध्येही असेच करत राहीन. T20 विश्वचषक जिंकणे हे माझ्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शिखर आहे, माझे एक स्वप्न पूर्ण झाले. आठवणी, उत्साह आणि अतूट पाठिंब्याबद्दल धन्यवाद.
२००९ साली भारतासाठी पदार्पण केल्यापासून जडेजाने ७४ टी-२० सामन्यांमध्ये २१.४५ च्या सरासरीने ५१५ धावा केल्या. याशिवाय त्याने ७.१३ च्या इकॉनॉमी रेटने ५४ विकेट्स घेतल्या. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-२० ला अलविदा केल्यानंतर जडेजाने निवृत्ती घेतली. मात्र, तो आता भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा भाग राहील.