वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी १५ क्रिकेटपटूंच्या भारतीय संघातून सुरेश रैना, रविंद्र जडेजा यांना वगळण्यात आले आहे. मध्यमगती गोलंदाज झहीर खान याला संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, ती फोल ठरली. झहीरला संघात स्थान देण्यात आलेले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये दमदार आगमन करणाऱया शिखर धवनला संघामध्ये स्थान देण्यात आले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने या कसोटी मालिकेनंतर आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
भारतीय संघ
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, प्रग्यान ओझा, अमित मिश्रा, अजिंक राहणे, उमेश यादव, मोहंमद सामी, रोहित शर्मा, इशांत शर्मा.

Story img Loader