Ayodhya Ram Mandir Opening Ceremony : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनंतर अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाही अयोध्येत पोहोचला आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सचिन आणि जडेजा सहभागी होणार आहेत. सचिन आणि जडेजासोबत विराट कोहलीलाही आमंत्रित करण्यात आले आहे. जडेजाचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तो हलक्या पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे.
त्तत्पूर्वी टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे अयोध्येला पोहोचले आहेत. व्यंकटेश प्रसाद हे देखील राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी आले आहेत. या दोघांनी आपापल्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जडेजाला आमंत्रित करण्यात आले होते. तो टीम इंडियासोबत हैदराबादमध्ये होता. मात्र सराव शिबिरानंतर कार्यक्रमासाठी अयोध्येला पोहोचला. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना २५ जानेवारी रोजी हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मासह सर्व खेळाडू हैदराबादला पोहोचले आहेत. एका रिपोर्टनुसार कोहलीही अयोध्येत आला आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा – IND vs ENG : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लडचा संघ हैदराबादमध्ये दाखल, पाहा VIDEO
या कार्यक्रमासाठी दिग्गज सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांच्यासह १७ हून अधिक खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये दोन महिला स्टार खेळाडू मिताली राज, हरमनप्रीत कौर यांचाही समावेश आहे. विराट कोहली अयोध्येला पोहोचल्याचा अंदाजही लावला जात आहे, मात्र याला अद्याप पुष्टी मिळालेली नाही. तर दुसरीकडे मिताली राजही अयोध्येत पोहोचली आहे.
हेही वाचा – IND vs ENG : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी जेम्स अँडरसनने गोलंदाजीत केला बदल, माजी खेळाडूने केले कौतुक
राम मंदिराची रचना पारंपारिक नगर शैलीत करण्यात आली आहे. मंदिराची लांबी ३८० फूट, रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे. मंडिकचा नकाशा चंद्रकांत सोमपुरा आणि त्यांचा मुलगा आशिष यांनी तयार केला आहे. मंदिर परिसर ७० एकरमध्ये पसरलेला आहे, त्यापैकी मुख्य मंदिराचे क्षेत्रफळ २.७ एकर आहे आणि बांधलेले क्षेत्र अंदाजे ५७,००० चौरस फूट आहे.