Ravindra Jadeja Reaches Temple with Wife Rivaba: भारतीय संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि वेस्ट इंडिज संघांत कसोटी, वनडे आणि टी-२० मालिका खेळल्या जाणार आहेत. यापैकी कसोटी आणि वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. या दोन्ही संघांत अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा संधी देण्यात आली आहे. सध्या रवींद्र जडेजा सुट्टीवर आहे.
दरम्यान रवींद्र जडेजा पत्नी रिवाबासोबत आशापुरा मातेच्या दर्शनासाठी पोहोचला आहे, ज्याचा फोटो त्याच्या पत्नीने ट्विटरवर शेअर केला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर रवींद्र जडेजा ब्रेकवर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार आहे. याआधी तो कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.
अशात रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाने काही फोटो ट्विट केले आहेत. हे फोटो कच्छमधील आशापुरा माता मंदिराची आहेत. रिवाबा आणि रवींद्र जडेजा या दोघांनी आशापुरा मातेचे दर्शन घेतले. या फोटोंना काही वेळातच ३ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्ध १२ जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी जडेजाचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. तो लवकरच टीम इंडियासोबत वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे. जडेजाने यापूर्वीही अनेक वेळा मंदिराला भेट दिली आहे. जडेजाने काही दिवसांपूर्वी फार्म हाऊसचे फोटो शेअर केले होते. यामध्ये तो घोड्यांसोबत दिसला होता. विशेष म्हणजे टीम इंडियाच्या सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत जडेजाचा समावेश आहे.
रवींद्र जडेजाने भारतासाठी आतापर्यंत ६५ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २७०६ धावा केल्या आहेत. जडेजाने या फॉरमॅटमध्ये ३ शतके आणि १८ अर्धशतके झळकावली आहेत. त्याने २६८ विकेट्सही घेतल्या आहेत. जडेजाने भारतासाठी १७४ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात २५२६ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने १३ अर्धशतके केली आहेत. टीम इंडियाच्या या अष्टपैलू खेळाडूने वनडेमध्ये १९१ विकेट घेतल्या आहेत.