भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत त्याच्या गुडघ्याला मोठी दुखापत झालेली असून त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शस्त्रक्रियेनंतर त्याला अनिश्चित काळासाठी आराम करावा लागण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे तो ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> भारताला मोठा धक्का! स्टार फलंदाज रवींद्र जडेजा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर? होणार मोठी शस्त्रक्रिया

सध्या यूएईमध्येआशिया चषक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेदरम्यान रवींद्र जडेजाला दुखापत झाली. स्पर्धेमधील सुपर ४ सामन्यांपूर्वी भारतीय संघाला हा झटका बसला. दरम्यान, चाचण्या केल्यानंतर जडेजाला झालेली दुखापत गंभीर असून शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. शस्त्रक्रियेनंतर त्याला अनिश्चित काळासाठी आराम करावा लागणार आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या बाहेर राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> Dhanashree Verma Surgery : धनश्री वर्मावर करण्यात आली शस्त्रक्रिया, फोटो केला शेअर; नेमकं काय झालं होतं?

टी-२० विश्चचषक स्पर्धेसाठी भारत संघ विजयासाठी दावेदार म्हटले जात आहे. भारतीय संघासाठी रवींद्र जडेजा हा हुकुमी एक्का होता. मात्र आता त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे या स्पर्धेपर्यंत तो तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे. आयपीएल २०२१ हंगामातही दुखापतीमुळे त्याला स्पर्धा अर्ध्यावर सोडावी लागली होती. त्यानंतर पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करून सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत त्याने धमाकेदार कामगिरी केली होती. मात्र ही स्पर्धादेखील त्याला अर्ध्यावर सोडावी लागली आहे.

Story img Loader