Champions Trophy 2025 Aakash Chopra on Ravindra Jadeja : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. जवळपास एक वर्षांनंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. याशिवाय फिरकीपटू वरुण चक्रवर्तीलाही संधी मिळाली आहे. वरुणला टी-२० संघात संधी मिळाल्यानंतर आता तो एकदिवसीय संघातही आपले स्थान पक्के करू शकेल का? अशी चर्चा सुरु आहे. मात्र, टी-२० फॉरमॅटमध्ये तो टीम इंडियासाठी कशी कामगिरी करतो यावर अवलंबून आहे. अशात माजी खेळाडू आकाश चोप्राने रवींद्र जडेजाबाबत मोठं वक्तव्य केल आहे.

आकाश चोप्रा काय म्हणाला?

माजी खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राच्या मते, जर वरुण चक्रवर्ती टी-२० मालिकेत आपली छाप सोडण्यात यशस्वी झाला, तर रवींद्र जडेजाला वनडे संघात स्थान मिळवणे कठीण होईल. रवींद्र जडेजाने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो फक्त कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळतो. पुढील महिन्यात यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ तयारी करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार असून, त्यासाठी संघाची निवड होणे बाकी आहे.

‘जडेजाला संघात स्थान मिळणे कठीण’ –

आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, “आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीम इंडियाकडे मजबूत फिरकी युनिट आहे. या युनिटमध्ये कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये वरुण चक्रवर्तीचा दावा सर्वात मजबूत आहे. त्यामुळे जडेजाला संघात स्थान मिळणे थोडे कठीण होऊ शकते. वरूण चक्रवर्ती मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.”

हेही वाचा – ILT20 2025 : दुबईने पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला चारली पराभवाची धूळ, निकोलस पूरनचे अर्धशतक ठरले व्यर्थ

आकाश चोप्राकडून वरूण चक्रवर्तीचे कौतुक –

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही वरूण चक्रवर्ती चमकदार कामगिरी करत आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या. तसेच तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळेच इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याचे पुनरागमन झाले असून वनडे मालिकेतही संघ व्यवस्थापन त्याच्यासोबत जाईल, अशी अपेक्षा आहे.”

हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! केन विल्यमसन नव्हे तर ‘हा’ खेळाडू सांभाळणार धुरा

वरुण चक्रवर्ती चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पहिली पसंती –

माजी क्रिकेटर म्हणाला, “भारतीय संघाबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक सोर्सकडून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत, त्यापैकी काही खऱ्या ठरतात. त्यामुळे सध्या मी जे ऐकतोय ते म्हणजे वरुण चक्रवर्ती हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पहिली पसंती आहे. अशा स्थितीत संघाबाहेर कोण असेल, रवींद्र जडेजा?” याशिवाय कुलदीप यादवच्या फिटनेसच्या समस्येमुळे त्याच्या निवडीबाबतही शंका आहे. अहवालानुसार, वरुण चक्रवर्ती फिरकी गोलंदाजी युनिटचे नेतृत्व करू शकतो, तर अक्षर पटेल संघातील दुसरा फिरकी गोलंदाज असेल. अशा स्थितीत तिसरा पर्याय म्हणून रवींद्र जडेजा राहील.

Story img Loader