Ravindra Jadeja Wife MLA Rivaba Jadeja Helping People: सध्या श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय खेळाडू सध्या विश्रांती घेत आहे. काही खेळाडू कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत तर काही देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्यस्त आहेत. दुलीप ट्रॉफीमधील संघामध्ये रवींद्र जडेजाची निवड झाली होती. परंतु त्याला संघातून रिलीज करण्यात आले आहे, ज्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान जडेजाने त्याच्या फार्म हाऊसमधील फोटो शेअर केले होते. तर त्याची पत्नी पुरात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी स्वतः कंबरेभर पाण्यात उतरली होती, ज्याचे व्हीडिओ समोर आले आहेत.
गुजरातमधील अनेक भागात पूरस्थिती कायम आहे. रिवाबा जामनगर उत्तरमधून आमदार आहे. या पूरस्थितीत अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी रिवाबा स्वत: कंबरेपर्यंत पाण्यात उतरतून परिस्थितीची पाहणी करत होती आणि लोकांना मदत करत होती. रिवाबाने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.
हेही वाचा – KL Rahul: “मी कोणत्याही…” केएल राहुलला LSG संघ रिलीज करणार? संघमालक संजीव गोयंकांचे मोठे वक्तव्य
रिवाबा जडेजा कंबरेपर्यंत खोल पाण्यात
या व्हिडिओमध्ये जडेजाची पत्नी कंबरेभर पाण्यात उभी असल्याचे दिसत आहे. तिच्या समोरून पाणी वेगाने वाहत आहे. दोन घरांच्या मध्ये शिडी टाकून लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत होते, याची पाहणी करण्यासाठी रिवाबा तिथे पाण्यात उभी होती. हे काम पाहण्यासाठी पोहोचलेल्या रिवाबाने लोकांशी संवादही साधला. यानंतर शहरातील डीसींना रिवाबा जडेजा भेटण्यासाठी आली. रिवाबाने शेअर केलेल्या व्हीडिओवर रवींद्र जडेजानेही कमेंट केली आहे, खरंच कमाल काम करताय, तुझा खूप अभिमान वाटतोय.
रिवाबाने ट्विट करून याबाबत माहिती दिली. ती म्हणाली, ‘मुसळधार पावसामुळे झालेल्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर बचाव कार्य आणि अन्न पाकिटांचे वाटप यासाठी जिल्हाधिकारी, आयुक्त आणि संरक्षण अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ज्यामध्ये गरज असेल तेथे हेलिकॉप्टर वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच प्रभाग ०२ मध्ये असलेल्या पुनित सोसायटीत अडकलेल्या कुटुंबांना बाहेर काढण्याच्या कामाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. यावेळी प्रभाग अध्यक्ष प्रज्ञेशभाई भट्ट, नगरसेवक जयराजसिंह जडेजा, जयेंद्रसिंह झाला व कार्यकर्ते उपस्थित होते.
१७ एप्रिल २०१६ रोजी रिवाबा आणि जडेजाचे लग्न झाले. २०१७ मध्ये त्यांची मुलगी निधायनाचा जन्म झाला. रिवाबा हिने २०१९ मध्ये गुजरातचे कृषी मंत्री आरसी फाल्दू आणि जामनगरच्या खासदार पूनम मदाम यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश केला. २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत तिला भाजपकडून तिकीट मिळाले होते. तिने जामनगर उत्तरमधून निवडणूक लढवली आणि आमदार म्हणून निवडूनही आली.