आयसीसी क्रमवारीत जडेजा अव्वल स्थानी
भारताचा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजा याने आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आयसीसी)च्या सर्वोत्तम एकदिवसीय सामन्यांतील उत्कृष्ट गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे.
संघात ‘सर’ या उपाधीने नावाजलेला रविंद्र जडेजा हा माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांच्यानंतरचा हा मान मिळविणारा पहिलाच भारतीय फिरकीपटू ठरला आहे. अनिल कंबळे यांनी गोलंदाजांच्या क्रमवारीत १९९६ मध्ये अव्वल स्थान मिळविले होते.
रविंद्र जडेजाने हा मान पहिल्यांदाज मिळविला असून त्याच्याबरोबर वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सुनील नरेन हा देखील अव्वल स्थानावर आहे. नरेन आणि जडेजा संयुक्तपणे उत्कृष्ट गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहेत.

Story img Loader