भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाची पत्नी रीवाबाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावार रीवाबाने भाजपामध्य प्रवेश केला आहे. गुजरातचे कृषीमंत्री आर सी फलदू आणि खासदार पूनम मादम यांच्या उपस्थितीत रीवाबाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा नेत्यांनी रीवाबाचे पक्षामध्ये स्वागत केले.  गेल्या वर्षी पोलीस कॉन्स्टेबल सोबत झालेल्या मारहाणीनंतर रिवाबा चर्चेत आली होती.

रीवाबा यापूर्वी करणी सेनामध्ये कार्यरत होती. समाजासाठी काही चांगलं करण्याच्या उद्देशाने भाजपामध्ये प्रवेश केल्याचे यावेळी रीवाबाने सांगितले. रीवाबाने दिल्लीमधून अभियंत्रिकेचे शिक्षण घेतले आहे. १७ एप्रिल २०१६ रोजी रीवाबा आणि रविंद्र जडेजा यांनी विवाहबंधनात अडकले होते. जून २०१७ रोजी त्यांना कन्यरत्न झाले होते.

  उद्योगपती आणि कंत्राटदार हरदेव सिंह सोळंकी यांची रिवाबा ही एकुलती एक मुलगी असून त्यांच्या स्वत:च्या २ खासगी शाळा आणि एक हॉटेल आहे. त्याचबरोबर रिवाबाचे काका हरिसिंह सोळंकी हे गुजरातमधील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. रिवाबाची आई प्रफुलब्बा राजकोट येथे रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. रीवाबाने प्रधानमंत्री मोदी यांच्या गुजरात दौऱ्यापूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आज सोमवारी पंतप्रधान दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.

Story img Loader