RCB vs DC Match Highlights in Marathi: शफाली वर्माने वादळी खेळी करत संघाचा विजय निश्चित केला आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत दिल्लीला विजयसाठी १४८ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना मेग लॅनिंग २ धावा करत स्वस्तात बाद झाली. पण शफालीने संघाचा डाव उचलून धरला आणि जोनासनने तिला चांगली साथ दिली. शफालीने ४३ चेंडूत ४ षटकार आणि ८ चौकारांसह ८० धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर जेस जोनासनने ३८ चेंडूत १ षटकार आणि ९ चौकारासह ६१ धावांची खेळी केली. शफाली आणि जेसने शतकी भागीदारी करत अवघ्या १५.३ षटकांत संघाला शानदार विजय मिळवून दिला.

शफाली वर्माने वादळी खेळी करत संघाचा विजय निश्चित केला आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत दिल्लीला विजयसाठी १४८ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना मेग लॅनिंग २ धावा करत स्वस्तात बाद झाली. पण शफालीने संघाचा डाव उचलून धरला आणि जोनासनने तिला चांगली साथ दिली. शफालीने ४३ चेंडूत ४ षटकार आणि ८ चौकारांसह ८० धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर जेस जोनासनने ३८ चेंडूत १ षटकार आणि ९ चौकारासह ६१ धावांची खेळी केली. शफाली आणि जेसने शतकी भागीदारी करत अवघ्या १५.३ षटकांत संघाला शानदार विजय मिळवून दिला.

तत्त्पूर्वी आरसीबीच्या संघाने एलिस पेरीच्या ६० धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ५ बाद १४७ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मानधना पुन्हा एकदा या सामन्यात फेल ठरली आणि ८ धावा करत बाद झाली. यानंतर डॅनियल वेट २१ धावा करत बाद झाली. तर एलिस पेरी आणि राघवी बिश्त यांनी चांगली भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.

एलिस पेरीने ४७ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांसह ६० धावा केल्या. तर राघवी बिश्तने ३२ चेंडूत २ षटकारांसह ३३ धावांची खेळी केली. याशिवाय इतर सर्व फलंदाज फेल ठरले. दिल्लीकडून शिखा पांडे आणि नवी गोलंदाज चारनी यांनी प्रत्येकी २ विकेट घेतले. तर मारिजन काप एक विकेट घेण्यात यशस्वी ठरली.

आरसीबीला यंदाच्या सीझनमध्ये श्रेयंका पाटील-आशा शोभना या गोलंदाजांची भासतेय कमी

तर आरसीबीकडून या सामन्यात फक्त रेणुका सिंग ठाकूर एक विकेट घेऊ शकली. आरसीबीला यंदाच्या वुमन्स प्रीमियर लीग सीझनमध्ये गोलंदाजांची कमी भासत आहे. संघाचे तीन महत्त्वाचे गोलंदाज श्रेयंका पाटील, आशा शोभना आणि सोफी मॉलिन्यू हे यंदाच्या मोसमातून दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. संघात किम गार्थ, रेणुका सिंग ठाकूर, जॉर्जिया वेयरहम आणि स्नेह राणा हेच मुख्य गोलंदाज आहेत. तर एलिस पेरीलाही यावेळेस फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. श्रेयंका पाटील गतवर्षी संघाची स्टार गोलंदाज होती. तर सोफी मॉलिन्यू अंतिम सामन्यातील सर्वाेत्कृष्ट गोलंदाज ठरली होती.

आरसीबीने सुरूवातीचे काही सामने जिंकले, पण घरच्या मैदानावर आरसीबीला एकही सामना जिंकता आलेला नाही. गोलंदाजीसह संघाची कर्णधार स्मृती मानधनाही गेल्या ४ सामन्यांमध्ये चांगल्या फॉर्मात नाहीय. संघाच्या गोलंदाजीबरोबरच एकूच संघाच्या कामगिरीवरही चर्चा होता आहे.

Story img Loader