RCB bought Yash Dayal in IPL 2024 mini auction : आयपीएल २०२३ चा एक लीग सामना, जो क्वचितच कोणीही विसरू शकतो, ज्यामध्ये केकेआरचा फलंदाज रिंकू सिंगने गुजरात टायटन्सचा गोलंदाज यश दयालच्या एका षटकात पाच चेंडूत सलग ५ षटकार मारले. रिंकू सिंगने सलग ५ षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी गुजरात टायटन्स संघाने यश दयाळला सोडले होते. आता त्याला विराट कोहलीच्या आरसीबी संघाची साथ मिळाली आहे.

रिंकू सिंगने सलग ५ षटकार मारलेल्या सामन्यानंतर हार्दिक पंड्या त्यावेळी गुजरातचा कर्णधार होता, त्याने यश दयाळ आजारी असल्याचे सांगितले होते आणि त्याचे वजनही ९ किलोने कमी झाले होते. बरं, आयपीएल २०२३ मध्ये यश दयाळसोबत जे काही घडलं ते झालं, पण आयपीएल २०२४ च्या लिलावात त्याच्यासोबत चांगलेच घडले आणि यावेळी आरसीबी संघाने ५ कोटी रुपये देऊन संघात सामील करुन घेतले. या लिलावात यशने त्याची मूळ किंमत २० लाख रुपये ठेवली होती.

Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Mitchell Starc on Virat Kohli about IND vs AUS Test Series
‘मला त्याच्याविरुद्ध खेळताना…’, मिचेल स्टार्कचे विराटबरोबरच्या स्पर्धेबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमच्या दोघात…’
AUS vs SCO Australia Team video viral with interesting Trophy
२६००० किमीचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला मिळालं वाडगं; चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
Duleep Trophy 2024 Akashdeep Statement on Mohammed Shami Gives Credit to His Advice After Taking 9 Wickets Haul
Duleep Trophy 2024: आकाशदीपला मोहम्मद शमीने दिला होता गुरूमंत्र, दुलीप ट्रॉफीतील सामन्यात ९ विकेट्स घेतल्यानंतर केला खुलासा
6 feet 7 inches tall 20 years old Josh Hull
ENG vs SL : शूज साईज १५ असलेल्या वेगवान गोलंदाजाचं इंग्लंडसाठी कसोटी पदार्पण, जाणून घ्या कोण आहे ‘तो’?
Musheer Khan Century in India b vs India a
Duleep Trophy 2024: मुशीर खानचे दुलीप ट्रॉफीमध्ये शानदार शतक, भाऊ सर्फराज खानच्या प्रतिक्रियेने वेधले लक्ष, पाहा VIDEO

यश दयाळला आरसीबीची मिळाली साथ –

आयपीएल २०२४ मध्ये यश दयाळ आता गुजरात नव्हे, तर आरसीबीकडून खेळताना दिसणार आहेत. यश दयाळने यापूर्वी आयपीएलच्या दोन मोसमात गुजरातकडून गोलंदाजी केली होती. २०२२ मध्ये जेव्हा गुजरात संघाने या लीगमध्ये प्रवेश केला, तेव्हा यश दयाळ या संघात सामील झाला होता. या फ्रँचायझीने त्याला ३ कोटी २० लाख रुपये देऊन विकत घेतले होते. यानंतर गुजरातने त्याला आयपीएल २०२३ साठी त्याच किमतीत कायम ठेवले होते, परंतु या हंगामात त्याच्या खराब कामगिरीमुळे संघाने त्याला सोडले.

हेही वाचा – IPL 2024 Auction : लिलावात मल्लिका सागरकडून मोठी चूक! आरसीबीला संघाला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा बसला फटका

आयपीएल २०२३ नंतर गुजरातने सोडल्यानंतर यश दयाळला पूर्वीपेक्षा चांगली किंमत मिळाली आहे. आरसीबीने त्याला ५ कोटी रुपयांना विकत घेतले. यश दयाळच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल सांगायचे, तर २०२२ साली या लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या यशने या मोसमात ९ सामन्यांमध्ये ११ विकेट घेतल्या, तर २०२३ मध्ये त्याने गुजरातकडून खेळलेल्या ५ सामन्यांमध्ये केवळ २ विकेट घेतल्या. आयपीएलच्या मागील दोन हंगामात साईने खेळलेल्या १४ सामन्यांमध्ये १३ विकेट घेतल्या असून ४० धावांत ३ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.