धडाकेबाज फलंदाज युसूफ पठाणच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्स संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर विजय मिळवता आला. चुरशीच्या लढाईत युसूफने ६० धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली होती. पण बंगळुरू संघाकडून कमकुवत गोलंदाजी झाल्याने कोलकाताला १८६ धावांचे आव्हान गाठता आले, या गावस्कर यांच्या विधानावर पठाणने नाराजी व्यक्त केली. बंगळुरूच्या गोलंदाजांनी ‘पोपटवाडी आक्रमण’ केल्याने बंगळुरूचे आव्हान गाठण्यात कोलकाताला यश आले, असे विधान सुनील गावस्कर यांनी केले होते.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना युसूफने गावस्कर यांच्या विधानावर असहमती दर्शवली. आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत खेळताना कोणताही संघ, फलंदाजीचा क्रम किंवा गोलंदाजी पोपटवाडी आक्रमण असू शकत नाही. गावस्कर यांनी व्यक्त केलेले मत हा त्यांचा वैयक्तीक दृष्टीकोन आहे. पण बंगळुरूच्या ताफ्यातील गोलंदाज वरुण अरोन, शेन वॉटसन यांच्याकडे पाहा. या दोघांनीही आपल्या क्रिकेट सामन्यांत देशाचे नेतृत्त्व केले आहे, असेही युसूफ पुढे म्हणाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा