विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने दिल्लीवर रंगतदार सामन्यात एका धावेनं विजय मिळवला. एबी डिव्हिलियर्सच्या नाबाद ७५ धावांच्या जोरावर बंगळुरुने दिल्लीसमोर १७१ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र दिल्लीचा संघ १७० धावांपर्यंतच मजल मारु शकला. ऋषभ पंत आणि शिमरॉन हेटमायर यांच्या खेळीमुळे एक वेळ अशी आली होती की, दिल्ली हा सामना जिंकेल. मात्र शेवटच्या षटकात मोहम्मद सिराजनं चांगली गोलंदाजी करत दिल्लीच्या तोंडातून घास हिरावून घेतला. शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी ६ धावांची आवश्यकता होती. तेव्हा ऋषभ पंतने चौकार मारला आणि बंगळुरुने हा सामना एका धावेनं आपल्या नावावर केला.

सामन्यातील पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत निराश झाला. यावेळी बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली त्याच्याजवळ आला आणि त्याचं सांत्वन केलं. तसेच चांगल्या खेळीबद्दल त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. त्याचबरोबर पंतसोबत मैदानात काही वेळ सुद्धा घालवता. तर मोहम्मद सिराजने हेटमायरला मिठी मारली. हा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत खात्यावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला नेटीझन्स पंसती देत असून दिलदार कोहलीचं कौतुक करत आहेत.

बंगळुरुने आयपीएल स्पर्धेत ६ पैकी ५ सामन्यात विजय मिळवला आहे. दिल्लीवरील विजयनानंतर आयपीएल गुणतालिकेत बंगळुरुचा संघ पुन्हा अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर दिल्लीला ६ पैकी ४ सामन्यात विजय आणि २ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. आयपीएल गुणतालिकेत दिल्लीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीचा पुढचा कोलकातासोबत २९ एप्रिलला आहे.

Story img Loader