Srivats Goswami Match Fixing Allegation : आयपीएलमध्ये खेळलेला विकेटकीपर-फलंदाज श्रीवत्स गोस्वामीने कोलकाता लीग क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा मोठा दावा केला आहे. गोस्वामीने गुरुवारी आरोप केला की, ज्याप्रकारे काही खेळाडू बाद झाले, त्यावरून बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या (सीएबी) फर्स्ट डिव्हिजन लीगमधील एक सामना फिक्स झाल्याचे दिसत आहे. हे सर्व पाहून मन दुखावल्याचे गोस्वामीने सांगितले. गोस्वामी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबादकडूनही खेळला आहे.

गोस्वामीने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले, ‘कोलकाता क्लब क्रिकेटमधील हा सुपर डिव्हिजन सामना आहे, दोन मोठे संघ असे करत आहेत, येथे काय चालले आहे याची काही माहिती? पहिल्या व्हिडिओमध्ये उजव्या हाताचा फलंदाज बॉल सरळ स्टंपवर सोडताना आणि नंतर अचानक मैदानाबाहेर जाताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, डावखुरा फलंदाज स्टंप आऊट होण्यासाठी वाईड बॉलवर क्रीजमधून बाहेर येतो.’

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
Krunal Pandya in Pushpa 2 Tarak Ponappa looks like Indian Cricketer Know The Truth Behind Viral Photos
Pushpa 2: ‘पुष्पा २’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत भारताचा क्रिकेटपटू? व्हायरल फोटोंमागचं काय आहे सत्य?
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन

सॉल्ट लेक येथील २२ यार्ड्स अकादमीमध्ये बुधवारी तीन दिवसीय सामना टाउन क्लबने सात गुणांसह संपवला. या सामन्यात शाकिब हबीब गांधीच्या २२३ धावांनी टाऊन क्लबला ४४६ धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात जॉयजित बसूच्या १०० धावांच्या जोरावर मोहम्मडन स्पोर्टिंगने २८१/९ धावा केल्या. बसू आऊट झाल्यानंतर मोहम्मडन स्पोर्टिंग संघ लगेच कोलमडला.

हेही वाचा – श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना बीसीसीआयच्या वार्षिक करारातून का वगळण्यात आलं?

‘हे पाहून माझे मन दुखावले’ –

३४ वर्षीय गोस्वामी म्हणाला की, हा एक प्रकारे क्रिकेटसाठी ‘वेकअप कॉल’ आहे. क्रिकेटमधील या हेराफेरीचे त्याने अनौपचारिक वर्णन केले आहे. गोस्वामी म्हणाला, ‘माझ्या हृदयाच्या खूप जवळ असलेला हा खेळ मी खेळला याची मला लाज वाटते.’ मला क्रिकेट आवडते आणि मला बंगालमध्ये खेळायला आवडते, पण हे पाहून माझे मन दुखावले. क्लब क्रिकेट हे बंगाल क्रिकेटचे हृदय आणि आत्मा आहे, कृपया ते नष्ट करू नका. क्रिकेटला जागवण्याचे काम मी केले असे वाटते, आता मीडिया कुठे आहे?’

हेही वाचा – IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया

स्नेहाशीष गांगुली यांनी मागितला अहवाल –

पीटीआयच्या या वृत्तानुसार देबब्रत दास यांनी या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सीएबीचे अध्यक्ष स्नेहशिष गांगुली म्हणाले की त्यांनी पंच आणि निरीक्षकांकडून अहवाल मागवला आहे. स्नेहाशिष हे सौरव गांगुलीचे मोठे बंधू आहेत. स्नेहाशीष गांगुली म्हणाले, आम्ही या विषयावर विचार करण्यासाठी टूर्नामेंट समितीची २ मार्च रोजी बैठक बोलावली आहे.

हेही वाचा – Team India : ‘हे सर्वांना लागू होत नसेल, तर…’, इरफान पठाणकडून बीसीसीआयच्या केंद्रीय करारावर प्रश्न उपस्थित

कोण आहे श्रीवत्स गोस्वामी?

श्रीवत्स गोस्वामीने २०२३ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. गोस्वामीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९९ डावांमध्ये ३२.४६ च्या सरासरीने ३०१९ धावा केल्या, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च खेळी नाबाद २२५ धावांची आहे, त्यात चार शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या सत्रात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाकडून खेळला होता. या सत्राच्या शेवटी त्याची उदयोन्मुख खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. गोस्वामीने आयपीएलमध्ये एकूण ३१ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने १४.६५. च्या सरासरीने २९३ धावा केल्या. गोस्वामी २००८ मध्ये अंडर-१९ विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता, त्याच २००८ च्या संघाचे नेतृत्व विराट कोहलीने केले होते.

Story img Loader