रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज आयपीएल २०२१ स्पर्धेत चांगलाच फॉर्मात आहे. आतापर्यंतच्या सामन्यात सर्वाधिक विकेट घेतल्याने पर्पल कॅपचा मानकरी आहे. असं असताना हर्षल पटेलने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. एका आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. हा विक्रम प्रस्थापित करताना त्याने भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराला मागे टाकलं आहे. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात हर्षल पटेलने ४ षटकात ३३ धावा देत ३ गडी बाद केले. १४ व्या आयपीएल स्पर्धेत हर्षल पटेलने आतापर्यंत एकूण २९ गडी बाद केले आहेत.
हर्षल पटेलने हा विक्रम मोडण्यापूर्वी जसप्रीत बुमराच्या नावावर हा विक्रम होता. बुमराने मागच्या आयपीएलमोध्ये एकूण २७ गडी बाद केले होते. तर भुवनेश्वर कुमारने २०१७ आयपीएलमध्ये २६ गडी बाद केले होते.
या स्पर्धेत हर्षल पटेलने हॅटट्रिकही घेतली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेत त्याने आपल्या गोलंदाजीची कसब दाखवली. मुंबईचे महत्त्वाचे तीन गडी बाद केल्याने बंगळुरूने सामन्यावर चांगलीच पकड मिळवली. हर्षल पटेलला सर्वात आधी हार्दीक पांड्याची विकेट मिळाली. हार्दीक पांड्या उंच फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. विराट कोहलीने त्याचा झेल तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर स्ट्राइकवर आलेल्या किरोन पोलार्डला त्रिफळाचीत केलं. त्यामुळे मुंबईच्या संघावर दडपड वाढलं. त्यानंतर हॅटट्रिक चेंडूवर राहुल चाहरला पायचीत केलं आणि तंबूचा धाडलं.
हैदराबादचा डाव
अभिषेक शर्माच्या रुपाने हैदराबादला पहिला धक्का बसला. १३ धावा करून अभिषेक शर्मा तंबूत परतला. या खेळीत १ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. जेसन रॉय आणि केन विलियमसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी ५० धावांची भागीदारी केली. हैदराबादने १० षटकात १ गडी बाद ७६ धावांची खेळी केली. संघाच्या धावा ८४ असताना केन विलियमसन बाद झाला. त्याने २९ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. यात चार चौकारांचा समावेश आहे. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. केन विलियमनस बाद होताच घसरगुंडी सुरु झाली. प्रियम गर्ग १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर जेसन रॉय त्याच षटकात बाद झाल्याने धावगती मंदावली. त्यानंतर मैदानात आलेला अब्दुल समादही साजेशी कामगिरी करू शकला नाही. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. वृद्धिमान साहाही मैदानात तग धरू शकला नाही. १३ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर शेवटच्या षटकात जेसन होल्डर बाद झाला. बंगळुरूकडून हर्षल पटेलनं ३ गडी बाद केले. डॅन ख्रिश्चियनने २, तर जॉर्ज गार्टन आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक गडी बाद केला.