आयपीएल म्हटलं की नवनवे विक्रम…मात्र असं असलं तरी अनेकांच्या नावावर नकोसे विक्रम प्रस्थापित झाले आहेत. त्याचबरोबर संघाच्या नावावर अनोख्या विक्रमांची नोंद केली गेली आहे. आतापर्यंतच्या आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक ऑलआउट झालेल्या संघांची नोंद झाली आहे. यामध्ये पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ सर्वाधिक वेळा ऑलआउट झाले आहेत.

आयपीएल कारकिर्दीत सर्वाधिक वेळा ऑलआऊट होणाऱ्या संघामध्ये दिल्लीचं नाव सर्वात वर येतं. मागच्या पर्वात दिल्लीने सर्वोत्तम कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. मात्र मुंबई इंडियन्सकडून पराभवाची चव चाखल्याने दूसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. दिल्लीकडून आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडू खेळले आहेत. मात्र संघाच्या नावावर नकोसा विक्रम आहे. दिल्लीने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत १९५ सामने खेळले आहेत. त्यापैकी २३ सामन्यात दिल्लीचा संघ ऑलआउट झाला आहे.

मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर सेहवागने कार्तिक-रसेलविषयी दिली ‘तिखट’ प्रतिक्रिया

दिल्लीनंतर राजस्थान रॉयल्सचा क्रमांक येतो. आयपीएल स्पर्धेचा पहिला चषक राजस्थान रॉयल्सच्या नावावर आहे. मात्र असं असलं तरी त्यानंतरच्या स्पर्धांमध्ये राजस्थानची कामगिरी चांगली राहिली नाही. हा संघ कधी विजयी धावांचा पाठलाग करताना ऑलआउट झाला आहे. तर कधी विजयासाठी धावा देताना ऑलआउट झाला आहे. खराब कामगिरीमुळे अनेकदा २० षटकांचा सामनाही हा संघ खेळू शकला नाही. आयपीएलमध्ये राजस्थानने १६२ सामने खेळले आहेत. त्यात १९ वेळा राजस्थानचा संघ ऑलआउट झाला आहे.

माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर 8 वर्षांची बंदी…वाचा कारण

तिसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ येतो. या संघाने आयपीएलमध्ये एकूण १९७ सामने खेळले आहेत. तर १९ वेळा बंगळुरुचा संपूर्ण संघ तंबूत परतला आहे. या संघात चांगले फलंदाज असूनही हा नकोसा विक्रम त्यांच्या नावावर प्रस्थापित झाला आहे.

आयपीएल स्पर्धेदरम्यान रोहित शर्माच्या बुटांची चर्चा!

चौथ्या क्रमांकावर पंजाब किंग्सचा संघ आहे. हा संघ १९ वेळा ऑलआउट झाला आहे. त्याचबरोबर या संघाने एकही आयपीएल चषक आपल्या नावावर केलेला नाही. आयपीएलच्या सुरुवातीला या संघाचं नाव किंग्स इलेव्हन पंजाब होतं. त्यानंतर ते बदलून पंजाब किंग्स करण्यात आले आहे.

Story img Loader