आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स संघाचा जलदगती गोलंदाज नवदीप सैनीने स्पॅनिश भाषेत ट्विट केले आहे. या ट्विटवर नेटकऱ्यांनी कोरिओग्राफर-डान्सर धनश्री वर्माला बंगळुरू संघातून खेळवण्याची प्रतिक्रिया दिली. आयपीएलचा आगामी हंगाम 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेन्नई येथे होणार आहे.

नवदीप सैनीने स्पॅनिश भाषेत एक ट्विट केले. या ट्विटला त्याने La familia (कुटुंब) असे कॅप्शन दिले आहे. नवदीपने ट्विटसोबत तीन फोटो पोस्ट केले आहेत.

 

या फोटोत आरसीबीचा संघ आपल्या रूममध्ये गप्पागोष्टी करताना दिसत आहे. त्यांच्यासोबत संघाचा फिरकी गोलंदाज यजुर्वेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्माही आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया

 

 

 

 

देवदत्तचा करोनाला ‘षटकार’

मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराटसेनेसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कल करोना चाचणीत निगेटिव्ह आला आहे. 22 मार्चला घेतलेल्या चाचणीत तो पॉझिटिव्ह आला होता. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, तो मुंबईविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यातही तो खेळू शकतो.  गेल्या हंगामात देवदत्तने आयपीएल पदार्पण केले आणि सलामीसाठी फलंदाजी करताना त्याने जबरदस्त कामगिरी केली. मागील वर्षी देवदत्तने  15 सामन्यात 5 अर्धशतकांसह 473 धावा केल्या.

विराटच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएलचा 13वा ‘ठीक’ गेला. चांगली कामगिरी करूनही विराटसेनेने हैदराबादकडून पराभव स्वीकारत प्ले ऑफचा प्रवास थांबवला. यंदाच्या लिलावात आरसीबीने 35.40 कोटी पैकी 34 कोटी तीन अष्टपैलू खेळाडूंवर खर्च केले. त्यांनी न्यूझीलंडच्या काईल जेम्ससनला 15 कोटी, ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला 14.25 आणि ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल ख्रिश्चनला 4.8 कोटींची बोली लावत संघात घेतले.

आरसीबीची इतर खेळाडूंवर बोली

  • सचिन बेबी (20 लाख)
  • रजत पाटीदार (20 लाख)
  • मोहम्मद अझरुद्दीन (20 लाख)
  • सुयश प्रभुदेसाई (20 लाख)
  • के. एस. भरत (20 लाख)