रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्सने रविवारी कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध ग्लेन मॅक्सवेलशी केलेल्या भागीदारीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या भागीदारीदरम्यान मॅक्सवेल आपल्यावर का चिडला होता, याचे उत्तरही त्याने दिले आहे. बंगळुरूने कोलकाताविरुद्ध 38 धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
ग्लेन मॅक्सवेलने बंगळुरूला संकटातून बाहेर काढत चांगली फलंदाजी केली. त्याने 78 धावांची खेळी केली. तर, डिव्हिलियर्सने डावाला अंतिम स्वरुप देत 76 धावा कुटल्या. सामन्यानंतर यजुर्वेद्र चहलशी केलेल्या बातचीतमध्ये डिव्हिलियर्सने मॅक्सवेलच्या रागाचा खुलासा केला. तो म्हणाला, ”जेव्हा मी खेळपट्टीवर गेलो, तेव्हा माझ्या लक्षात आले की मॅक्सवेल खूप थकला आहेत. त्याने मला सांगितले, की त्याला जास्त धावण्याची इच्छा नाही. पण, मी दोन आणि तीन धावा घेत माझ्या खेळीला प्रारंभ केला. त्यामुळे तो माझ्यावर खूप रागावला होता.”
Chahal chats up with ‘Mr. 360’ ABD@yuzi_chahal is back on mic duties as he interviews @ABdeVilliers17 on his 76-run blitz, his partnership with @Gmaxi_32 & more. – By @28anand#VIVOIPL #RCBvKKR @RCBTweets
Watch the full interview https://t.co/x871aJvcrC pic.twitter.com/Pfs1qyaU4O
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2021
एबी डिव्हिलियर्स डावाच्या 12व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलची साथ देण्यासाठी खेळपट्टीवर आला. तेव्हा मॅक्सवेल 60 धावांवर खेळत होता. या दोघांनी 53 धावांची भागीदारी केली.
डिव्हिलियर्स म्हणाला, ”खरे सांगायचे तर आम्ही एकमेकांसोबत खेळण्याचा आनंद घेत होतो. आम्हीसुद्धा एकाच प्रकारचे आणि ऊर्जावान खेळाडू आहोत. जेव्हा मी फलंदाजीला आलो तेव्हा भागीदारी करायची होती. मॅक्सवेलने मला सांगितले, की विकेट चांगली आहे. शेवटच्या काही सामन्यांपेक्षा 20 टक्के चांगली आहे. भागीदारी आवश्यक असल्याचे तेव्हा मला कळले.”