आयपीएल २०२१ स्पर्धेवर सध्या करोनाचं सावट आहे. त्यामुळे खेळाडुंची काळजी घेण्यासोबत बायो बबलची कडक नियमावली आखण्यात आली आहे. करोनामुक्त वातावरणात स्पर्धा पार पडावी यासाठी व्यवस्थापक प्रयत्नशील आहेत. मात्र स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा आघाडीचा फलंदाज देवदत्त पडिक्कल याला करोनाची लागण झाल्याने चिंतेचं वातावरण पसरलं होतं. करोनावर यशस्वीरित्या मात करत देवदत्त आता स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला आराम देण्यात आला होता. असं असलं तरी देवदत्तला बायो बबलमध्ये जाण्याची थेट परवानगी दिल्याने इतर संघानी नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

देवदत्त पडिक्कलला २२ मार्चला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर देवदत्तने होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान त्याच्या तीन करोना चाचण्या निगेटिव्ह आल्या. करोनावर यशस्वीरित्या मात केल्यानंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात परतण्याचा निर्णय घेतला. ७ एप्रिलला त्याला चेन्नईतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बायो बबलमध्ये सहभागी करून घेण्यात आलं. यावेळी एका कारमधून तो आला होता आणि सर्व नियमांचं पालन केल्याचं व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं.

पंत विरुद्ध धोनी

आयपीएलमधील इतर संघानी मात्र नियमावलीवर बोट ठेवलं आहे. देवदत्तला थेट बायो बबलमध्ये येण्याची मुभा कशी दिली याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. देवदत्तला किमान ७ दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाइन करणं गरजेचं होतं. मात्र नियमांचं उल्लंघन झाल्याचं सांगत इतर संघांनी नाराजी व्यक्त केली आहे.

माजी क्रिकेटपटू लक्ष्मणची सोशल मीडियावर ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ पोस्ट

देवदत्त पडिक्कलने सर्व नियमांचं पालन केले आहे. त्यानंतरच त्याला बायो बबलमध्ये सहभागी करून घेतलं. त्याचे तीन करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे कोणत्याच नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं आरसीबी प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात देवदत्त खेळला नसला तरी आरसीबीने चांगली कामगिरी केली. मुंबई इंडियन्सला आघाडीच्या सामन्यात २ गडी राखून पराभूत केले. मुंबई इंडियन्सने ९ गडी गमवत विजयासाठी १५९ धावांचं लक्ष ठेवलं होतं. आरसीबीने हे लक्ष्य ८ गडी गमवत गाठलं.