Michael Bracewell as Will Jack’s replacement for IPL 2023: रॉयल चॅलेंजर्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे. खरं तर, संघाला विल जॅकची जागी बदली खेळाडू मिळाला आहे, जो दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला होता. आरसीबीने इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३ साठी इंग्लंडचा फलंदाज विल जॅक्सच्या जागी न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलला करारबद्ध केले आहे. युवा फलंदाज जॅकला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल ३.२ कोटी रुपयांना लिलावात विकत घेतले होते, पण दुखापतीमुळे तो आयपीएलमधून बाहेर पडला.

येत्या हंगामात ब्रेसवेल आरसीबीसाठी कितपत फायदेशीर ठरेल हे येणारा काळच सांगेल, पण एक गोष्ट निश्चित आहे की आरसीबीला जॅकचा योग्य बदली खेळाडू शोधण्यात यश आले आहे. अलीकडेच किवी संघ एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. मायकेल ब्रेसवेलने पहिल्या वनडेत शानदार फलंदाजी केली. त्याने ५७ चेंडूत शतक झळकावले. त्याने ७८ चेंडूत १० षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने १४० धावा केल्या होत्या.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
IPL 2025 player auction list announced 574 cricketers set to feature with 204 slots available See Full List in Marathi
IPL 2025 Players Auction List: आयपीएल २०२५ च्या लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, २०४ जागांसाठी ५०० हून अधिक खेळाडूंवर लागणार बोली
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या
IPL 2025 Mega Auction Most Expensive Foreigner Player
IPL 2025 : जोस बटलर किंवा मिचेल स्टार्क नव्हे तर… दक्षिण आफ्रिकेचा ‘हा’ युवा अष्टपैलू ठरु शकतो सर्वात महागडा परदेशी खेळाडू

ब्रेसवेलची क्रिकेट कारकीर्द –

ब्रेसवेलच्या टी-२० क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने १६ टी-२० आंतरराष्ट्रीय मध्ये ११३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर २१ विकेट्स घेतल्या आहेत. तो १ कोटी रुपयांच्या मूळ किमतीवर आरसीबीमध्ये सामील होईल. याशिवाय त्याने न्यूझीलंडकडून 8 कसोटी आणि १९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ५१० धावा आणि कसोटीत ४२.२५ च्या सरासरीने २५९ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – VIDEO: शादाब खानने बाबरची विकेट फिक्स केली होती का? पीएसएलच्या ‘या’ लीक झालेल्या व्हिडिओने उडवून दिली खळबळ

बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जॅकला दुखापत झाली होती –

२४ वर्षीय इंग्लिश फलंदाज विल जॅक्सला या महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात दुखापत झाली. मिरपूर येथे झालेल्या दुसऱ्या वनडेदरम्यान क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती.ही त्याची वनडे क्रिकेटमधील पदार्पण मालिका होती. स्कॅन आणि तज्ञाशी सल्लामसलत केल्यानंतर त्याने आयपीएलमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.

आयपीएल २०२३ साठी आरसीबी संघ –

फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन ऍलन, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मोहम्मद सिराज, जोश वुडल , सिद्धार्थ कौल, आकाश दीप, सोनू यादव, अविनाश सिंग, राजन कुमार, मनोज भंडागे, हिमांशू शर्मा, रीस टोपले, मायकल ब्रेसवेल.