RCB shares special video as Virat Kohli completes 16 years in IPL : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. तर विराट कोहली आता आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमन करू शकतो. विराट कोहली आणि त्याची आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी आजचा दिवस खूप खास आहे. विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबरोबर आयपीएलमध्ये १६ वर्षे पूर्ण केली आहेत. विराट कोहली जेव्हापासून आयपीएल खेळत आहे, तेव्हापासून तो आरसीबीसोबत आहे. आजपर्यंत विराट कोहलीने एकाही हंगामात आरसीबीची साथ सोडलेली नाही.
आरसीबीने विराटसाठी शेअर केला एक खास व्हिडिओ –
विराट कोहलीने २००८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. त्यानंतरच विराट कोहली आयपीएलमध्ये पदार्पण करत आरसीबीमध्ये सामील झाला. तेव्हापासून आजपर्यंत विराट कोहली आयपीएलमध्ये फक्त आरसीबीकडून खेळताना दिसत आहे. आता विराट कोहलीची निष्ठा दाखवण्यासाठी आरसीबीने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना आरसीबीने लिहिले की, ‘निष्ठा ही सर्वोच्च आहे. किंग कोहली, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो.’
विराट कोहलीची आयपीएल कारकीर्द –
विराट कोहलीच्या चाहत्यांना नेहमी त्याला आरसीबीच्या जर्सीत पाहण्याची इच्छा असते.आता पुन्हा एकदा विराट कोहलीला आरसीबीच्या जर्सीत पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. आयपीएलच्या इतिहासात विराट कोहलीने आतापर्यंत २३७ सामने खेळले असून त्यात कोहलीने २२९ डावांमध्ये ७२६३ धावा केल्या आहेत.
हेही वाचा – Ranji Trophy 2024 Final : रोहित शर्माच्या सहकाऱ्याने केली निवृत्तीची घोषणा, शेवटच्या सामन्यात घातला धुमाकूळ
२०१६ हे वर्ष विराटसाठी खूप खास राहिले –
या कालावधीत विराट कोहलीने ७ शतके आणि ५० अर्धशतके केली आहेत. २०१६ चा आयपीएल हंगाम विराट कोहलीसाठी खूप खास होता. या मोसमात विराटच्या बॅटमधून ९०० हून अधिक धावा झाल्या. यासह विराट कोहली आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.विराट कोहलीने अनेक वर्षे आरसीबीचे कर्णधारपदही भूषवले होते पण तो आपल्या संघासाठी आयपीएलचे विजेतेपद मिळवू शकला नाही. त्यानंतर विराटने २०२२ मध्ये आरसीबीचे कर्णधारपद सोडले. तेव्हापासून आरसीबीचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू फाफ डू प्लेसिस करत आहे.