आयपीएलध्ये आज बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये ‘एलिमिनेटर’ सामना रंगणार आहे. या लढतीमध्ये पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार असल्याने दोन्ही संघातील खेळाडू विजयासाठी सर्वस्व पणाला लावतील. दरम्यान आरसीबीच्या एका खेळाडूला आयपीएलमधील सर्वात मोठी कामगिरी नोंदवण्याची संधी आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या हर्षल पटेलकडे भीमपराक्रम नोंदवू शकतो.

बंगळुरुचा गोलंदाज हर्षल पटेलने आतापर्यंत ३० विकेट्स घेतली आहेत. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या ब्राव्होच्या रेकॉर्डपासून हर्षल पटेल फक्त तीन विकेट दूर आहे. चेन्नईकडून खेळताना २०१३ मध्ये ब्राव्होने ३२ विकेट्स घेतल्या होत्या. एलिमिनेटर सामन्यात हा रेकॉर्ड मोडण्याची संधी हर्षल पटेलकडे आहे. या सामन्यात विजयी होणारा संघ दिल्लीशी भिडणार आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने दिल्लीचा पराभव केला.

हर्षलने आधीच भारतीय गोलंदाजाने आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड मोडला आहे. हा रेकॉर्ड बुमराहाच्या नावे होता. बुमराहने २०२० च्या हंगामात आयपीएलमध्ये २७ विकेट्स घेत सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला होता. दरम्यान हर्षलने हैदराबादविरोधात तीन विकेट्स घेत हा रेकॉर्ड मोडला होता.

हर्षलने आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड केले आहेत. अनकॅप्ड गोलंदाजाने सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्डही त्याच्या नावावर आहे. या हंगामात पर्पल कॅपचा मानकरी हर्षल पटेलच असणार आहे. कारण दुसऱ्या क्रमांकावर अवेश खान असून त्याच्या नावे २३ विकेट्स आहेत. त्यामुळे हर्षल पटेलकडे सात विकेट्स जास्त आहेत.

हर्षल पटेलच्या जबरदस्त कामगिरीने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिली असून १७ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये त्याला संधी द्यावी अशी मागणी करत आहेत. हर्षलला १५ खेळाडूंमध्ये संधी मिळालेली नाही. राखीव ठेवण्यात आलेल्या तीन खेळाडूंमध्येही त्याचं नाव नाही.

Story img Loader