RCB-W vs UPW-W : मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर महिला प्रिमीयर लीगचा आठवा सामना रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर आणि युपी वॉरियर्स यांच्यात सुरु आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सलामीसाठी मैदानात उतरलेल्या कर्णधार स्मृती मानधनाने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. या सामन्यातही स्मृतीला धावांचा सूर न गवसल्याने ती अवघ्या ४ धावांवर बाद झाली. २९ धावांवर आरसीबीची पहिली विकेट पडली. पण सोफी डिवाईन आणि एलिस पेरी यांनी आरसीबीचा डाव सावरत फलकावर धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. पेरीने ३९ चेंडूत ५२ धावांची आक्रमक खेळी केली. दरम्यान, आरसीबीने २० षटकात सर्वबाद १३८ धावा केल्या. त्यामुळे युपी वॉरियर्सला सामन्या जिंकण्यासाठी १३९ धावा कराव्या लागतील. एलिस पेरीच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने युपी वॉरियर्सला १३९ धावांचं आव्हान दिलंय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा