युएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबद्दल चांगली बातमी समोर आली आहे. स्पर्धेदरम्यान, प्रेक्षकांना स्टेडियममधील क्षमतेच्या ७० टक्क्यांपर्यंत परवानगी दिली जाईल. आयसीसी आणि स्पर्धेचे यजमान बीसीसीआय यांना यूएई सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. त्याचबरोबर आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला दुबईत होईल.
आयसीसीचे कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ अलार्डिस यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ओमान आणि यूएईमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चाहत्यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. चाहत्यांना टी-२० विश्वचषक पाहण्याची संधी मिळेल. आमचे यजमान बीसीसीआय, एमिरेट्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) आणि ओमान क्रिकेट तसेच चाहत्यांनी सुरक्षित वातावरणात क्रिकेट पाहणे सुनिश्चित केल्याबद्दल स्थानिक सरकारांचे आभार.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा