चॅम्पियन्स लीग स्पर्धेत रिअल माद्रिदने अ‍ॅटलेटिको माद्रिदला नमवत जेतेपदाची कमाई केली होती. अ‍ॅटलेटिको माद्रिदने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत या दुखऱ्या पराभवाची परतफेड केली. अ‍ॅटलेटिकोने ही लढत २-१ अशी जिंकली. लागोपाठ दोन पराभवांमुळे रिअल माद्रिदची गुणतालिकेतही घसरण झाली आहे. बार्सिलोना अव्वल स्थानी आहे.
दहाव्या मिनिटाला कोकेच्या कॉर्नरवर तिआगोने हेडरद्वारे गोल करत अ‍ॅटलेटिकोचे खाते उघडले. अ‍ॅटलेटिकोच्या दमदार आक्रमणापुढे रिअलचा संघ दडपणाखाली आला. मात्र दुखापतीतून सावरत तीन आठवडय़ांनंतर पुनरागमन करणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने २६व्या मिनिटाला गोल करत रिअल माद्रिदला बरोबरी करून दिली.
गोलरक्षणात सारख्या चुका करणाऱ्या आणि चेंडूला स्पर्श करणारा रिअलचा कर्णधार इकर कॅसिलासची प्रेक्षकांनी हुर्यो उडवली. चेंडूवर अ‍ॅटलेटिकोच्या संघानेच ताबा राखला. रिअलच्या खेळाडूंनी गोलसाठी वारंवार प्रयत्न केले, मात्र अ‍ॅटलेटिकोने भक्कम बचावाच्या जोरावर हे प्रयत्न थोपवले. ७६व्या मिनिटाला जुआनफ्रानच्या क्रॉसवर आद्रा तुरानने सुरेख गोल करत अ‍ॅटलेटिकोला आघाडी मिळवून दिली. आघाडीमुळे सुरक्षित स्थिती गाठणाऱ्या अ‍ॅटलेटिकोने आक्रमणाचा वेग कमी करत बचावावर भर दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा