प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असलेल्या रेयाल माद्रिदने अल अैन संघाला ४-१ अशी धूळ चारून संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे झालेल्या क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. यंदाच्या चॅम्पियन्स लीगच्या विजेत्या रेयालचे हे सलग चौथे क्लब विजेतेपद ठरले.

रेयालसाठी लुका मॉड्रिचने १४व्या मिनिटाला पहिला गोल केला. तर मार्कोस लॉरेंटने ६०व्या आणि सर्गियो रामोसने ७८व्या मिनिटाला अनुक्रमे दुसरा व तिसरा गोल नोंदवला.

८६व्या मिनिटाला त्सुआका शितोनीने अल अैन संघासाठी एकमेव गोल केला. ९२व्या मिनिटाला नादेर मुस्तफाने चुकीने स्वयंगोल करत रेयालच्या खात्यात चौथ्या गोल जमा केला.

Story img Loader